भर रस्त्यात चालू कारमधून बाळ खाली पडलं, आई मात्र गाडी चालवत पुढे गेली अन् मग…; पाहा व्हिडीओ

मुंबई | आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आईला देवाचा दर्जा दिलेला आहे. प्रत्येकंच आई आपल्या बाळाला अगदी हाताचा पाळणा करून लहानाचं मोठं करत असते. मुलांना सांभाळताना कोणतीही आई जरासाही हलगर्जीपणा करत नाही. लहान मुलांच्या बाबतीत जरासा जरी निष्काळजीपणा झाला तरी ते त्यांच्या जिवावर बेतू शकतं.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एका आईचा निषकळजीपणा कसा मुलाच्या जिवावर बेतला असता, हे स्पष्ट दिसत आहे. एका चालत्या कारमधून भर रस्त्यात बाळ खाली पडतं. मात्र, आई तशीच पुढे गेल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, रोडवर सिग्नलला काही गाड्या थांबलेल्या आहेत. सिग्नल संपताच त्या गाड्या हळू हळू पूढे निघू लागतात. तेवढ्यात या गाड्यांपैकी एका गाडीच्या पाठीमागच्या बाजूने एक लहान मुलगा खाली पडतो. गाडी चालवणाऱ्या त्याच्या आईला काही वेळ या गोष्टीची भनक देखील लागत नाही.

आई तिच्या धुंदीत गाडी चालवत पुढे जाते. बाळ गाडीतून खाली पडल्याचं पाहिल्यानंतर इतर गाड्या थांबतात. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे चालू गाडीतून पडल्यानंतर देखील त्या बाळाला काही होत नाही. ते बाळ उठून पुन्हा आईच्या कारमागे धावू लागतं.

चौकातून पूढे गेल्यानंतर बाळाच्या आईला समजतं की बाळ कारमध्ये नाही. यामुळे ती तातडीने गाडी थांबवून पाठीमागे बघते तर तिला तिचं बाळ गाडीच्या मागे धावत येताना दिसतं. यावेळी रस्त्यावर गाड्यांची ये जा चालू असते. मात्र, बाळाला पाहून सर्व गाड्या आपला वेग कमी करतात.

यावेळी आपल्या आईच्या कारमागे धावताना हे लहान मूल थोडंस घाबरतं. त्याला नेमकं कुठे जावं हे समजत नाही. या दरम्यान एक स्कुटरवरून आलेली महिला बाळाचा हात पकडून त्याला सांभाळते. तेवढ्यात बाळाची आई देखील बाळापर्यंत पोहोचते आणि बाळाला उचलून कुशीत घेते.

ही संपूर्ण घटना चौकात असणाऱ्या सीसीटीव्हीमध्ये कैद होते. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे? याविषयी आद्यप माहिती मिळाली नाही. शिरीन खान नावाच्या एका महिलेने हा व्हिडीओ ट्विटरवरून शेअर केला आहे. ‘असं कसं होऊ शकतं?’, असा कॅप्शन शिरीनने हा व्हिडीओ शेअर करताना दिला आहे.

दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप वेगानं व्हायरल होत आहे. लोक यावर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. या व्हिडिओला भरभरून लाईक देखील मिळाल्या आहेत. आत्तापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.

महत्वाच्या बातम्या –

‘द कपिल शर्मा शो’मधील अभिनेत्रीनं केला साखरपूडा, सोशल मीडियाद्वारे दिली माहिती

मराठी चित्रपटांसाठी महाराष्ट्रात भिक मागावी लागते याला…

‘दोस्ताना 2’च्या वादानंतर करण जोहरनं सोशल मीडियावरुन…

IPL 2021: हैदराबादच्या पराभवाची हॅट्रिक, मुंबईचा 13 धावांनी…

पतीपेक्षा वयाने मोठी असणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीने…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy