पहिल्या महिंद्रा थारची बोली पोहोचली 1.10 कोटीवर; का लावत आहेत लोक एवढी बोली?

नवी दिल्ली | महिंद्रा ऑटोमोटिव्ह कंपनी आपल्या हटके गाड्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. 15 ऑगस्ट 2020ला महेंद्रा कंपनीनं आपल्या ‘SUV थार’ या नवीन जनरेशनवरून पडदा हटवला होता. महेंद्रा कंपनीनं आता आपली थारची न्यू ब्रँड ऑफ-रोडर बाजारात आणली आहे. महिंद्रा कंपनीची यावर्षीची ही सर्वात मोठी लाँचिंग आहे.

थारला लॉंच करण्यापूर्वी महिंद्रा कंपनीनं या गाडीचा लिलाव करण्याचं ठरवलं.  24 सप्टेंबर पासून कंपनीनं कोरोना महामारीशी लढण्यासाठी हा लिलाव सुरु केला होता. महिंद्रा कंपनीनं आपल्या अधिकृत वेबसाईटवर न्यू थारच्या लिलावाची बोली सुरु केली होती.

SUV थारच्या या ऑनलाईन लिलावात 29 सप्टेंबरच्या सकाळी बोली 80 दशलक्षांच्या पुढे गेली होती. लिलावाची अंतिम तारीख 27 सप्टेंबर होती. मात्र, पुन्हा ही तारीख दोन दिवस वाढवून 29 सप्टेंबरपर्यंत करण्यात आली होती. 29 सप्टेंबर हा लिलावाचा शेवटचा दिवस असल्यानं या दिवशी लिलावाची किंमत 1 कोटी पर्यंत जाणं अपेक्षित होतं. मात्र, थारची अंतिम बोली तब्बल 1.10 कोटीच्या पार गेली आहे.

महिंद्रा ऑटोमोटिव्ह कंपनीच्या 75व्या संस्थापक दिनानिम्मित 2 ऑक्टोबरला गाडी भारतात लॉंच केली गेली आहे. थारच्या लिलावातून मिळालेली सर्व रक्कम  कोरोना महामारीशी लढण्यासाठी वापरण्यात येणार आहे.

महिंद्रा SUV थार दिसायलाही अगदी आकर्षक आहे. महिंद्रा थार एएक्स एसी ट्रीमची किंमत 9.80 लाख रुपयांपासून सुरुवात होते. तर महिंद्रा थार एलएक्स एसी ट्रीमची किंमत 13.75 लाख रुपयांपर्यंत आहे. थार पूर्वीच्या बॉक्सरी डिझाइनवर बनवली गेली आहे. मात्र, नवीन थार 2020 मागील मॉडेलपेक्षा आकारात मोठी आहे. या थारला हार्ड टॉप आणो सॉफ्ट टॉप असे दोन्ही पर्याय दिले गेले आहेत. तसेच या थारची फिनिशिंगही उत्तम आहे.

2020 महिंद्रा थारच्या एसयूव्हीला अनेक इंजिन पर्याय आणि उपकरणे दिली गेली आहेत. एलएक्स व्हेरिएंटसह 18 इंच अलॉय व्हील्स, स्वयंचलित गिअरबॉक्स तसेच इतरही काही महत्वाच्या गोष्टी या थारमध्ये देण्यात आल्या आहेत. महिंद्रा थारचं इंजिनसुद्धा अतिशय उत्तम बनविण्यात आलं आहे.

महिंद्रा ऑटोमोटिव्हने थार ऑफ रोडिंग बरोबर फोर-व्हील लो, फोर-व्हील हाय आणि टू-व्हील ड्राइव्ह मोडसह मेकॅनिकल 4 बाय 4 ट्रान्सफर केसची सुविधा दिली आहे. नवीन थारच्या पुढील भागात स्वतंत्र सस्पेंशन दिलं आहे. तर मागील भागात मल्टी लिंक युनिट दिलं गेलं आहे.

तसेच या थारची आणखीही काही वैशिष्ट्ये आहेत. या थारमध्ये मॅन्युअल एचव्हिएसी, पॉवर विंडोज, दोन यूएसबी पोर्टस, 12 व्हॉटची पॉवर सॉकेट, रिमोट लॉकिंग, सेंट्रल लॉकिंग, स्पीड अलर्ट सिस्टम, मागील पार्किंग सेन्सर्स, ड्यूअल फ्रंट एअरबॅग्ज इत्यादी वैशिष्ट्यांचा समावेश आहे.

महिंद्रा ऑटोमोटिव्हने या थारची बुकिंग सुरू केली आहे. देशातील 18 शहरांमध्ये थारची टेस्ट ड्राइव्ह सुद्धा सुरू करण्यात आली आहे. 1 नोव्हेंबरपासून नवीन महिंद्रा थार ग्राहकांपर्यंत पोहचवली जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘टॉप’वर पोहचण्यासाठी अनेक हिरोईननी केलं ‘हे’ काम; ईशा कोप्पिकरचा धक्कादायक खुलासा

रतन टाटांच्या टाटा मोटर्सला भारतीयांची साथ, सप्टेंबरमध्ये तब्बल ‘इतक्या’ टक्क्यांनी विक्रीत वाढ…!

उत्तर प्रदेशमध्ये आणखी एक सामूहिक ब.लात्कार; भाजप नेत्याला ठोकल्या बेड्या!

बॉलिवूड इंडस्ट्रीला मोठा धक्का! वयाच्या अवघ्या 27व्या वर्षी ‘या’ अभिनेत्रीचं निधन

आयपीएलमध्ये धोनीनं केला ‘हा’ कारनामा; सुरेश रैनाला टाकलं मागे!