Top news मनोरंजन

“सुशांतला धमकावत त्याच्यावर बला.त्काराचे आरोप केले जात होते”

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृ.त्युनंतर कंगना राणावतनं बॉलीवूड इंडस्ट्रीतील वाईट गोष्टींविरुद्ध जणू बंडच पुकारलं आहे. बॉलीवूड इंडस्ट्रीवर टी.का करताना कंगनानं सोशल मीडियावरून अनेक वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. यामुळे गेल्या काही दिवसांपासून कंगना सतत चर्चेत आहे. सुशांत प्रकरणी एम्सच्या मेडिकल टीमनं महत्वाचे रिपोर्ट सीबीआयकडे सोपविले आहेत. यावरही कंगनानं आपली प्रतिक्रिया दिली आहे.

सुशांत सिंह राजपुतची ह.त्या झाली नाही तर सुशांतनं आ.त्मह.त्या केली आहे, असा अहवाल एम्सच्या टीमनं दिला आहे. सुशांत सिंह राजपूतची ह.त्या झाली असावी, या शक्यतेला एम्सच्या टीमनं नकार दिला आहे. एम्सच्या या रिपोर्टनंतर सुशांतला धमकावलं जात होतं, असं म्हणत कंगनानं ट्वीटरवरून काही सवाल विचारले आहेत.

तरुण आणि प्रतिष्ठित लोक असेच एखाद्या दिवशी उठून स्वतःला ठा.र करत नाहीत. सुशांत म्हणायचा की त्याच्यावर अ.त्याचार केले जात आहेत. सुशांतला त्याच्या भविष्याची भीती वाटत होती. त्याला मुव्ही मा.फियांची भीती वाटत होती. मुव्ही मा.फियांनी सुशांतला बॅन करून त्याला मानसिक त्रास दिला. तसेच जेव्हा त्याच्यावर बला.त्काराचा खोटा आ.रोप लावण्यात आला तेव्हा तो मानसिकरित्या पूर्ण विचलित झाला होता, असं कंगनानं म्हटलं आहे.

या ट्वीटनंतर आणखी एक ट्वीट करत कंगनानं काही प्रश्न विचारले आहेत. सुशांतनं काही प्रोडक्शन हाऊसेसची नावे दिली आहेत ती प्रोडक्शन हाऊसेस कोणती आहेत? मीडियानं सुशांत सिंह राजपूतवर रे.पचा आरोप का लावला? महेश भट्ट सुशांतचे मनोविश्लेष्ण का करत होते?, असेही सवाल कंगनानं विचारले आहेत.

तसेच कंगनानं यशराज फिल्म्सवरही आ.रोप केले आहेत. यशराज फिल्म्स बरोबर आपलं पटत नसल्यानं तिथून बाहेर पडण्याबद्दल सुशांत उघडपणे बोलला होता. आणखी काही बड्या प्रोडक्शन हाऊसेसनं सुशांतवर बंदी घातली होती, हे देखील एक सत्य आहे. सुशांतच्या चांगल्या चित्रपटांना केव्हाच महत्व दिलं गेलं नाही. सुशांत सोशल मीडियावरून लोकांना नेहमी सांगत असायचा की त्याला चित्रपट सृष्टीतून काढून टाकलं जाईल, असंही कंगनानं म्हटलं आहे.

सुशांतच्या मृ.त्युपासून कंगना सातत्यानं सुशांतची ह.त्या करण्यात आली आहे, असं म्हणत होती. यासंबंधित अनेक पोस्ट तिनं सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. तसेच सुशांत प्रकरणानंतर कंगनानं चित्रपट सृष्टीची पडद्याआड लपलेली काळी बाजू समोर आणण्याचाही प्रयत्न केला आहे.

दरम्यान, सुशांत प्रकरणाला आत्तापर्यंत अनेक वेगवेगळी वळणं मिळाली आहेत. सुशांत प्रकरणात अं.मली पदार्थांचा संबंध आढळल्यापासून ना.र्कोटिक्स कंट्रोल ब्युरो याप्रकरणी तपास करत आहे. अं.मली पदार्थ प्रकरणी बॉलीवूड इंडस्ट्रीतील अनेक दिग्गज सध्या एनसीबीच्या रडारवर आहेत.

अभिनेत्री श्रद्धा कपूर, सारा आली खान, नम्रता शिरोडकर, दीपिका पादुकोण तसेच अभिनेता शाहरुख खान, अर्जुन रामपाल, रणवीर कपूर यांचीही नावे अं.मली पदार्थ प्रकरणी समोर आली आहेत. एनसीबी या कलाकारांवर पुढे काय कारवाई करेल, हे पाहणं सध्या महत्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

पहिल्या महिंद्रा थारची बोली पोहोचली 1.10 कोटीवर; का लावत आहेत लोक एवढी बोली?

‘टॉप’वर पोहचण्यासाठी अनेक हिरोईननी केलं ‘हे’ काम; ईशा कोप्पिकरचा धक्कादायक खुलासा

रतन टाटांच्या टाटा मोटर्सला भारतीयांची साथ, सप्टेंबरमध्ये तब्बल ‘इतक्या’ टक्क्यांनी विक्रीत वाढ…!

उत्तर प्रदेशमध्ये आणखी एक सामूहिक ब.लात्कार; भाजप नेत्याला ठोकल्या बेड्या!

बॉलिवूड इंडस्ट्रीला मोठा धक्का! वयाच्या अवघ्या 27व्या वर्षी ‘या’ अभिनेत्रीचं निधन