Top news महाराष्ट्र मुंबई

सर्वसामान्यांना सर्वात मोठा झटका; गॅस सिलेंडर ‘इतक्या’ रूपयांनी महागला

lpg gas e1608980974737

मुंबई | सर्वसामान्यांना आणखी मोठा झटका बसला आहे. घरगुती LPG Gas Cylinder च्या किमतीत 50 रुपये प्रति सिलेंडर वाढ करण्यात आली आहे. ही वाढ आज शनिवार 7 मे 2022 पासून लागू करण्यात आली आहे.

एका आठवड्यापूर्वी 1 मे रोजी सरकारी तेल कंपन्यांनी कमर्शियल एलपीजी सिलेंडरचे दर वाढवले होते. त्यावेळी प्रति सिलेंडर 102.50 रुपये किमती वाढवण्यात आल्या होत्या.

1 एप्रिल रोजी 19 किलोच्या कमर्शियल एलपीजी दरात 250 रुपयांची वाढ करण्यात आली होती.

नव्या किमती लागू झाल्यानंतर दिल्लीत 1 मेपासून 19 किलोग्रॅम कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किमती 2253 रुपयांवरुन 2355.50 रुपये झाल्या.

गॅस सिलिंडरचे सध्याचे दर जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही सरकारी तेल कंपनीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्याविषयी माहिती घेऊ शकता.

यासाठी तुम्हाला https://iocl.com/Products/IndaneGas.aspx या लिंकवर क्लिक करावं लागेल.

महत्त्वाच्या बातम्या- 

IAS अधिकाऱ्याच्या घरी सापडलं ‘इतक्या’ कोटींचं घबाड; नोटा पाहून अधिकारीही चक्रावले

मोठी बातमी! ‘या’ भाजप नेत्याला अटक होण्याची शक्यता

“मी मुख्यमंत्री होईन असं कधी वाटलंही नव्हतं, पण…” 

सपना चौधरीच्या ‘या’ गाण्यावर तरुणाई फिदा, 32 कोटींहून अधिक वेळा पाहिला गेला व्हिडीओ 

“खासगीकरणाची खाज वाढायला लागलीय, कुठे-कुठे खाजवणार?”