मुंबई | माजी गृहमंत्री अनिल एकामागेएक झटके मिळताना दिसत आहेत. अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या वकिलांकडून त्यांच्या जामीनासाठी भरपूर प्रयत्न करण्यात आले. पण देशमुखांना जामीन मिळणं कठीण होऊन बसलं आहे. विशेष म्हणजे मुंबई सत्र न्यायालयाने आज अखेर अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.
100 कोटी वसुलीप्रकरणी आरोप असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख अनेक दिवसांपासून गायब होते. अनिल देशमुख यांना 5 वेळा समन्स बजावल्यानंतरही ईडीसमोर हजर राहिले नव्हते. त्यामुळे त्यांना त्यांच्या नावानं लूक आऊट सर्क्युलर जारी करण्यात आलं होतं.
देशमुख यांचा शोध घेण्यासाठी ईडीकडून सीबीआयकडे मदत मागण्यात आली होती. अखेर 1 नोव्हेबर रोजी अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर झाले. सकाळी 11 वाजेच्या सुमारास अनिल देशमुख ईडी कार्यालयात पोहोचले होते. त्यानंतर जवळपास 12 तासांच्या चौकशीनंतर अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली होती.
अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांप्रकरणी ईडीचा काही दिवसांपूर्वीच तपास पूर्ण झाला होता. ईडीकडून जवळपास 7 हजार पानी आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं. या आरोपपत्रात अनिल देशमुख हे मुख्य आरोपी असल्याचा उल्लेख करण्यात आला होता. तर सह आरोपी म्हणून अनिल देशमुख यांचे सचिव संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांना दाखवले गेले होते.
या आरोपपत्रात अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख याला ईडीने फरार घोषित केले आहे. या प्रकरणात एकूण 3 जणांना ईडीने फरार घोषित केले आहे. .
समन्स देवून देखील अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख हा चौकशीला हजर राहिला नाही मात्र याप्रकरणी अटकेपासून आपल्याला संरक्षण मिळावे या करता ऋषिकेश देशमुख याने न्यायालयात धाव घेतली होती. पण याप्रकरणी अजूनही न्यायालयीन प्रक्रिया सुरूच आहे.
ईडीच्या अटकेची कारवाई टाळण्यासाठी देशमुख यांनी मुंबई हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. पण, कोर्टाने त्यांची याचिका फेटाळून लावली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
“नान्या सापडला काय तो गावगुंड?, सापडला असेल तर फटकन जावई करून घे”
“नाना पटोलेंच्या वक्तव्यावर राहुल गांधी गप्प का?”
“…कुछ नन्हें पटोले”; अमृता फडणवीसांची पटोलेंवर शायराना अंदाजात टीका
“नानांनी तर हद्दच केली, मालकिणीचा सगळ्यात प्रामाणिक कुत्रा दाखवण्यासाठी…”