तो मोठा होईपर्यंत मी थांबायला तयार!; या बोल्ड अभिनेत्रीला करायचंय तैमूरसोबतच लग्न!

मुंबई| बॉलिवुमधील प्रसिद्ध अभिनेत्री नोरा फतेही ही आपल्या मॉडेलिंग आणि तिच्या ग्लॅमरस फोटोंसाठी नेहमी चर्चेत असते.  तसेच ती तिच्या डान्ससाठी ओळखली जाते.  तिने तिच्या करिअरची सुरुवात बॉलिवूड चित्रपट, ‘गर्जनाः टायगर्स ऑफ द सुंदरबन्स’ या मालिकेतून केली होती.

त्यानंतर ती बाहुबली : द बिगनिंग आणि किक 2 या चित्रपटांच्या आयटम नंबरमध्ये दिसली होती. नोरा ‘सत्यमेव जयते’ या चित्रपटातील तिच्या ‘दिलबर’ या गाण्यामुळे अधिक फेमस झाली आहे. आता नोरा फतेही म्हणाली की, “मला तैमूर सोबत लग्न करायचं आहे.” नोरा फतेही आता तिच्या या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे.

बॉलिवूडमधील प्रसिध्द अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करीना कपूर यांचा मुलगा तैमूर अली खान सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे.  तैमूर नेहमीच त्याच्या क्यूटनेसमुळे चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असतो.  तैमूर त्याच्या हुशारीमुळे ही सतत चर्चेत असतो.

नोरा फतेही करीना कपूरच्या शो ‘व्हॉट वुमन वॉन्ट 3’ या कार्यक्रमामध्ये पाहुणी म्हणून आली होती. त्यावेळी करीना कपूरने नोराला सांगितले की, तिला आणि सैफ अली खानला नोराच्या डान्स मूव्हज खूप आवडतात.  तेव्हा करीना कपूर समोर नोरा फतेहीने तिच्या लग्नाचा प्रस्ताव ठेवला आहे.

त्यानंतर नोरा फतेही करीना कपूरला म्हणाली की, “मला अशी आशा आहे की, लवकरच तैमूर मोठा होईल.  तेव्हा तुम्ही माझा आणि त्याच्या (तैमूरच्या) इंगेजमेंट किंवा लग्नाचा विचार करू शकाल का?” असे नोरा फतेही तिच्या आणि तैमूरच्या लग्नाविषयी बोलले.

त्यावर करिना तिच्या उत्तरात असे म्हणाली की, “तैमूर आता फक्त 4 वर्षांचा आहे आणि त्याला मोठा होण्यासाठी खूप वेळ लागणार आहे.”  त्यावर नोरा फतेही हसली आणि म्हणाली की, “मी तो मोठा होईपर्यंत थांबायला तयार आहे.”

नोरा फतेहीला तैमूर त्याच्या जन्मापासुनच आवडत होता. नोरा त्याची जबरदस्त फॅन आहे. ती सत्यमेव जयते या बॉलीवुड चित्रपटातील ‘दिलबर’ गाण्यात दिसली. त्या गाण्याने रिलीजच्या पहिल्या 24 तासांत युट्यूबवर 20 मिलियन पेक्षा जास्त व्ह्यू ओलांडले होते. काही दिवसांपूर्वीच नोरा फतेहीचे इंस्टाग्रामवर 20 मिलियन पेक्षा जास्त फॉलोवर्स झाले आहे.

दरम्यान, करीना कपूर तिची दुसरी प्रेग्नेंसी मस्त एन्जॉय करत आहे.  प्रेग्नेंट असूनही ती तिच्या कामावर लक्ष केंद्रित करत आहे.  करीना कपूरने तिच्या प्रेग्नेंसी मध्येच ‘लाल सिंग चड्ढा’ या आगामी चित्रपटाचे चित्रिकरणही केले आहे.  या चित्रपटाच दिग्दर्शन ‘करण जोहर’ने केले आहे.  ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटामध्ये करीना कपूर अमीर खानसोबत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

महिंद्राने आणली सर्वात स्वस्त इलेक्ट्रीक कार; किंमत आहे फक्त…

ब.जेट मोठं नाही??? फक्त ५ लाख रुपयांच्या आत यापैकी एक गाडी होऊ शकते तुमची!

काँग्रेसला मोठा ध.क्का, या बड्या नेत्याचं झालं नि.धन!

टाटांची ‘ही’ जबरदस्त कार नव्या रुपात; आतापर्यंतचा सर्वात मोठा बदल!

प.गार कमी असला तरी पूर्ण होईल चारचाकीचं स्वप्न; अगदी स्व:स्तात मिळत आहेत ‘या’ दोन गाड्या!