अनेक दिग्गज अभिनेत्रींना मागे टाकत ‘ही’ अभिनेत्री झाली भारताची ‘नॅशनल क्रश’!

मुंबई | चित्रपट सृष्टीत एका पेक्षा एक सुंदर अनेक अभिनेत्री आहेत. चित्रपट सृष्टीतील अनेक अभिनेत्रींनी स्वतःच्या मेहनतीवर चित्रपट सृष्टीत उच्च नाव कमावले आहे. अशीच एक अभिनेत्री म्हणजे रश्मिका मंदाना. बेंगलुरू अभिनेत्री रश्मिका मंदाना ही दक्षिण भारतीय चित्रपटातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. या अभिनेत्रीचे खुप कमी वेळात प्रचंड चाहते झाले आहेत.

तिने हिंदी, तमिळ आणि तेलुगू चित्रपटात काम केलं आहे. तिचे अनेक चित्रपट प्रसिद्ध झाले आहेत. रश्मिकाला यापूर्वीच दक्षिण सिनेसृष्टीत कर्नाटक क्रश ही पदवी मिळाली होती.

यामुळे तिचे चाहते आनंद व्यक्त करत होते. अशातच आता अलीकडेच रश्मिका मंदाना गूगलवर राष्ट्रीय क्रश म्हणून ओळखली जात आहे. ही माहिती मिळताच रश्मिकाचे चाहते तीला राष्ट्रीय क्रशची पदवी मिळवली म्हणुन भरभरुन शुभेच्छा देत आहेत.

तसेच नॅशनल क्रश रश्मिका मंदाना असा हॅशटॅगही सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. रश्मिकाचे चाहते या हॅशटॅगचा वापर करुन बरीच ट्वीट व कमेंट्स करत आहेत.

गूगलवर सर्च केलं की रश्मिका मंदानाला भारताचा राष्ट्रीय क्रश म्हणून दाखवलं जात आहे. जर आपण गुगलवर ‘नॅशनल क्रश ऑफ इंडिया २०२०’ शोधलं तर रश्मिका मंदानाचे नाव दिसून येईल.

महेश बाबू, गीता गोविंदम, सरिलारू आणि नाकेवेरू यांच्यासारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमुळे अभिनेत्री रश्मिका मंदाना खूप लोकप्रिय झाली आहे. या चित्रपटांतील भूमिकेतून रश्मिकाने अनेक चाहत्यांची मनं जिंकली आहेत.

कर्नाटक क्रश म्हणून ओळखल्या जाणारी रश्मिका मंदाना सोशल मीडियावर बरीच लोकप्रिय आहे. मात्र, आता रश्मिकाची ही लोकप्रियता केवळ दक्षिणेपुरती मर्यादीत राहिलेली नाही तर ती राष्ट्रीय स्तरावरची पहिली पसंती बनली आहे. तेलगू चित्रपटात बॅक टू बॅक हिट्स चित्रपट देणारी अभिनेत्री आता तामिळमधील ‘कार्ती सुलतान’ या तिच्या आगामी चित्रपटासाठी चर्चेत आहे.

दरम्यान, रश्मिकाचा ‘पुष्पा’ हा चित्रपट लवकरच येणार आहे. यात ती स्टाईलिश स्टार अल्लू अर्जुनसोबत दिसणार आहे. आतापर्यंत रश्मिकाचे आउटफिट चर्चेते होता. परंतु तिचा गोंडस चेहरा, सौंदर्य आणि स्टाईलमुळे ती आता गुगल सर्चमधील सर्वाधिक पसंती असलेली अभिनेत्री झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

तरुणांना मोठा धक्का! ‘हे’ राज्य सरकार सर्वच आॅनलाईन गेम्सची हाकलपट्टी करणार

फायनल अल्टीमेटलाही कंगना अनुपस्थित? आता मुंबई पोलीस कंगनाला अ.टक करणार?

चंद्राबाबूंच्या मुलाला धूळ चारणाऱ्या पुण्यात शिकलेल्या आमदाराला भेटलो तेव्हा…

नेहा कक्करच्या हनिमूनचा बेडरूम मधील ‘तो’ व्हिडिओ तूफान व्हायरल; पहा व्हिडिओ

मोदी महाविकास आघाडीचं सरकार पाडत राष्ट्रपती राजवट लागू करणार? चंद्रकांत पाटील म्हणाले…