भाजपला मोठा धक्का! भाजपला रामराम ठोकत ‘हे’ माजी केंद्र मंत्री उद्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार

औरंगाबाद | अलीकडे महाराष्ट्राच्या राजकारणात बऱ्याच महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. एकनाथ खडसे यांच्या पक्षांतरानंतर भाजपला जणू खिंडारंच पडू लागलं आहे. अनेक बडे नेते अलीकडे भाजपला रामराम ठोकत आहेत. अशातच आता आणखी एक बडा नेता भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे.

मराठवाड्यातील भाजपचे दिग्गज नेते जयसिंगराव गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजपला सोडचिठ्ठी दिलेले जयसिंगराव गायकवाड आता राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशी माहिती समोर आली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत जयसिंगराव गायकवाड उद्या मुंबई येथे राष्ट्रवादीत प्रवेश करतील. यावेळी राष्ट्रवादीचे इतरही काही दिग्गज नेते उपस्थित असतील. गायकवाड यांच्यासोबतच इतरही काही नेते राष्ट्रवादीत प्रवेश करतील, असंही बोललं जात आहे.

जयसिंगराव हे भाजप पक्षातील अगदी वरिष्ठ नेते होते. त्यांनी केंद्रात दोनवेळा राज्यमंत्रीपद भूषविले आहे. तसेच ते बीड मतदार संघातून तीनवेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. जयसिंगराव गायकवाड यांच्या जाण्यानं भारतीय जनता पार्टीला मोठं नुकसान सहन करावं लागणार आहे.

मराठवाडा पदवीधर मतदार संघातून उमेदवारी न मिळाल्यानं नाराज झालेल्या जयसिंगराव गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वीच भाजप पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. यानंतर त्यांनी स्वतंत्र्यपणे दाखल केलेला उमेद्वारी अर्ज देखील मागे घेतला होता. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भाजप पक्ष सोडण्याचं कारण सांगितलं होतं.

भाजपला पराभूत करण्यासाठीच मी पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीतून मागार घेत आहे. भाजप पक्षातील नेत्यांना जास्त मस्ती आली आहे. तो पक्ष सध्या हवेत गेला आहे. ते सध्या विमानापेक्षाही जास्त उंचीवर गेले आहेत. मात्र, मी भाजपला धडा शिकवणार आहे त्यासाठी पक्षाने तयार राहावे, असा इशारा जयसिंगराव गायकवाड यांनी यावेळी दिला होता.

तसेच जवळपास दहा वर्षांपासून मी नेतृत्वाकडे यबाबत मागणी करत होतो. मी कित्येकवेळा पक्षातील वरिष्ठ नेत्यांना याबाबत फोन केले, पत्र पाठवली, मेल केले तरीही पक्षाने मला संधी दिली नाही. पक्षात सातत्याने माझ्या होणाऱ्या उपेक्षेला कंटाळूनच मी पक्षाचा राजीनामा देत आहे, असं जयसिंगराव गायकवाड यांनी यावेळी स्पष्ट केलं होतं.

दरम्यान, राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असल्यानं या तीन पक्षांच्या ताकदीमुळे भाजपला पदवीधर मतदार संघाची निवडणूक अवघड जाणार आहे. अशातच आता जयसिंगराव गायकवाड यांच्या पक्षांतरामुळे भाजपला मराठवाड्यातही मोठा झटका सहन करावा लागू शकतो.

महत्त्वाच्या बातम्या-

अनेक दिग्गज अभिनेत्रींना मागे टाकत ‘ही’ अभिनेत्री झाली भारताची ‘नॅशनल क्रश’!

तरुणांना मोठा धक्का! ‘हे’ राज्य सरकार सर्वच आॅनलाईन गेम्सची हाकलपट्टी करणार

फायनल अल्टीमेटलाही कंगना अनुपस्थित? आता मुंबई पोलीस कंगनाला अ.टक करणार?

चंद्राबाबूंच्या मुलाला धूळ चारणाऱ्या पुण्यात शिकलेल्या आमदाराला भेटलो तेव्हा…

नेहा कक्करच्या हनिमूनचा बेडरूम मधील ‘तो’ व्हिडिओ तूफान व्हायरल; पहा व्हिडिओ