मोठी बातमी! मंत्री नवाब मलिकांना आणखी एक झटका

मुंबई | राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) सध्या ईडीच्या अटकेत आहेत. मनी लाॅर्डिंग आणि दाऊद कनेक्शन प्रकरणात त्यांना कोठडी सुनावली आहे.

नवाब मलिकांच्या अटकेला जवळपास महिना पूर्ण होत असून भाजपने यावरुन आक्रमक भूमिका घेतला आहे. नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजप वारंवार मागणी करत आहे.

नवाब मलिकांच्या अटकेवरुन त्यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्याचं पहायला मिळत आहे. अशातच आता पुन्हा त्यांच्या अडचणींत वाढ झाली आहे.

नवाब मलिकांची कोठडी 4 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली असून मलिकांचा कोठडीतील मुक्काम आणखी वाढला आहे.

वाब मलिक यांना अटक करण्यात आल्यानंतर काही दिवसांनी त्यांना प्रकृती अस्वास्थामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा सरकार कधी घेणार? आता त्यांचा राजीनामा घेतला नाही तर हे स्पष्ट आहे की हे सरकार दाऊदच्या दबावाखाली काम करतंय, असं भाजपकडून सांगण्यात येत आहे.

मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपतर्फे राज्यभरात आंदोलन करण्यात आली. उद्धव ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरेंची आठवण करून देत विरोधक टीका करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

  “फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्यांची अडवणूक करू नका, अन्यथा…”

 “30 वर्षांनी तुमच्या मुलींना पण हिजाब घालावा लागेल”; भाजप नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

 Weather Update: पुढील 12 तास धोक्याचे, ‘या’ भागात कोसळणार पाऊस

  …म्हणून रात्री बारा वाजता खांद्याला बॅग लटकवून रस्त्यावर धावत होता मुलगा, पाहा व्हिडीओ

  पेट्रोल डिझेलच्या दरात काय बदल झाला, वाचा एका क्लिकवर