मुंबई | राज्यात सध्या विविध शैक्षणिक वर्षांच्या परीक्षा चालू आहेत. अनेक ठिकाणी गैरप्रकार घडत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
राज्यात कोरोना काळानंतर शाळा आणि महाविद्यालय सुरू झाली पण अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या घरच्या आर्थिक परिस्थितीमुळं फिज भरण्यास उशीर होत आहे.
फीज भरण्यास विलंब केल्याच्या कारणावरून राज्यात सध्या कागदपत्रे अडकवून ठेवल्याची अनेक प्रकरण समोर येत आहेत.
शाळा आणि महाविद्यालय व्यवस्थापनाकडून विद्यार्थ्यांना अडवण्यात येत आहे. परिणामी विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता नाकारत येत आहे.
सर्व प्रकरणांवर राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दोषी असणाऱ्या शाळा-महाविद्यालय व्यवस्थापनावर कडक कारवाईचे निर्देश दिले आहेत.
राज्यासह देशात नावाजलेली टाटा सामाजिक शिक्षण संस्था देखील विद्यार्थ्यांची कागदपत्रे अडकवून ठेवत असल्याची प्रकरण समोर आली आहे.
टाटा सारख्या संस्थेन अशाप्रकारचं कार्य करून नये, असंही मुंडे म्हणाले आहेत. प्राचार्यांनी विद्यार्थ्यांची कागपत्रे अडकवल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा मुंडेंनी दिला आहे.
दरम्यान, 153 विद्यार्थ्यांची पदवी आणि पदव्यूत्तर प्रमाणपत्र देण्यास टाटा संस्थेनं नकार दिल्यानंतर राज्यात अशाप्रकारची अनेक प्रकरण समोर आली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
“30 वर्षांनी तुमच्या मुलींना पण हिजाब घालावा लागेल”; भाजप नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य
Weather Update: पुढील 12 तास धोक्याचे, ‘या’ भागात कोसळणार पाऊस
…म्हणून रात्री बारा वाजता खांद्याला बॅग लटकवून रस्त्यावर धावत होता मुलगा, पाहा व्हिडीओ
पेट्रोल डिझेलच्या दरात काय बदल झाला, वाचा एका क्लिकवर
‘… तर तिसरं महायुद्ध होणार’; युक्रेनच्या राष्ट्रपतींचं मोठं वक्तव्य