‘दिग्दर्शकानं मला….’. ‘या’ अभिनेत्रीनं सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव

मुंबई| अभिनेत्री प्राची देसाईने अवघ्या 17व्या वर्षी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतून आपल्या करिअरची सुरूवात केली. प्राचीनं आपल्या कारकिर्दित अनेक चढ-उतारांचा सामना केला आहे. अनेक अडचणींना सामोरं जात ती आज या यशाच्या शिखरावर असलेली पहायला मिळत आहे. टेलिव्हिजन इंडस्ट्रीतून करिअरची सुरूवात करत बॉलिवूडपर्यंत आपली वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे.

नुकतीच तिने ‘बॉलिवूड बबलला’ मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत तिने तिला आलेला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव शेअर केला आहे. यापूर्वी बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींनी त्यांना आलेले कास्टिंग काऊचचे अनुभव सांगितले आहेत.

‘बॉलिवूड बबलला’ दिलेल्या मुलाखतीत बोलताना तिने सांगितले की, एका मोठ्या सिनेमाचा प्रोजेक्ट होता. या सिनेमातील भूमिकेसाठी दिग्दर्शकाने माझ्याकडे शरिरसूखाची मागणी केली होती. मात्र, मी या सिनेमाला नकार दिला. तिने नकार दिल्यानंतरही त्या दिग्दर्शकाने तिच्याशी पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी मी त्यांना, मला तुमच्या सिनेमात काडीचाही रस नाही असे स्पष्ट सांगितले होते. पुढे ती म्हणाली की, बॉलिवूडमध्ये नेपोटिझम आहे. राजकारणाप्रमाणेच बॉलिवूडमध्येही भ्रष्टाचार होतो असे मला वाटते. प्राचीने यावेळी सिनेमांतील नेपोटिझमवरही चर्चा केली. हे बॉलिवूडमध्ये सगळीकडे पहायला मिळते असेही ती म्हणाली.

फक्त प्राची नाही तर आता पर्यंत अनेक अभिनेता आणि अभिनेत्रींनी त्यांना आलेल्या कास्टिंग काउचचा अनुभव उघडपणे सांगितले आहेत. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री अकिंता लोखंडेनेही तिला आलेले कास्टिंग काउचचे दोन अनुभव सांगितले होते.

17 वर्षांची असताना प्राचीने मालिकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. तिने ‘रॉक ऑन’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने काही चित्रपटांमध्ये काम केले. पण तिचे काही चित्रपट हिट ठरले तर काही फ्लॉप.

काही दिवसांपूर्वीच ती मनोज बाजपेयीसोबत वेब सीरिज ‘सायलेन्स’मध्ये दिसली होती. जेव्हा तिला या मुलाखतीत तिच्या भविष्यातील प्लानबद्दल विचारण्यात आलं त्यावेळी ती म्हणाली, ‘एका दिग्दर्शकाचं काम खूप जबाबदारीचं असतं. पण तो जे करतो ते खूपच उत्तम असतं. हे काम अर्थातच खूप कठीण आहे. पण मला वाटतं मी ते करायला हवं. मी भविष्यात दिग्दर्शन करेन.’

दरम्यान, आपल्या सौंदर्य आणि अभिनयानं सगळ्यांना वेड लावणाऱ्या प्राची देसाईचे अनेक चाहते आहेत. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी संपर्क साधत असते.

महत्वाच्या बातम्या – 

सायली संजीवचा ‘हा’ व्हिडीओ होतोय सोशल मीडियावर…

‘मुंबईत लोकांचा मृत्यू होतोय आणि इथे आयपीएल खेळवली…

जाणून घ्या! कोरोना काळात ‘या’ पदार्थांचे सेवन…

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या दिग्दर्शिका सुमित्रा…

रुग्ण अतिशय गंभीर अवस्थेत असलेली रुग्णवाहिका ट्राफिकमध्ये…