पुढचे दोन दिवस महत्त्वाचे, ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राज्यात सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक भागात अतिवृष्टी झाल्याने पूरसदृश्यस्थिती निर्माण झाली आहे.

काही ठिकाणी दरड कोसळल्याने प्रवाशांची तारांबळ उडत आहे. मागील दिवसात राज्याला मुसळधार पावसाने झोडपलं असून आता मात्र पावसाचा जोर कमी होणार आहे.

राज्यात 16 तारखेनंतर पावसाचा जोर कमी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. मात्र, तत्पूर्वी अनेक जिल्ह्यांना रेड व ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मराठवाड्यासह विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मुंबईत गेल्या 4 दिवसांपासून ऑरेंज अलर्ट होता पण आता मुंबईला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

रायगड आणि पालघर जिल्ह्यात रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर ठाणे, मुंबई उपनगर, पुणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी, सातारा, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

दरम्यान, अनेक भागात पावसाचा जोर ओसरत असला तरी कोकण किनारपट्टी व सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

शरद पवारांनी शिवसेना फोडली म्हणणाऱ्या केसरकरांना अजित पवारांचा प्रेमाचा सल्ला, म्हणाले…

अभिनेत्री सुष्मिता सेनने ललित मोदीसोबत संसार थाटला?, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

“165 आमदारांचं पाठबळ तरी, दोघंच अख्ख्या महाराष्ट्राचे मालक झालेत”

मोठी बातमी! अनिल परब यांच्या अडचणीत आणखी वाढ

मंकीपॉक्सने सर्वांचं टेंशन वाढवलं; केंद्र सरकारनं उचललं महत्त्वाचं पाऊल