लस घेण्यासाठी आलेल्या मुलीनं असं काही केलं की, डाॅक्टर म्हणाले ‘इथून निघ’, पाहा व्हिडीओ

मुंबई| मागील वर्षापासून आपण कोरोनासोबत जगत आहोत, त्याला संपवण्यासाठी लढत आहोत. कोरोनाच्या दुस-या लाटेने तर मृत्युचे तांडवच चालवले आहे.

कोरोनाच्या दुस-या लाटेने महारौद्ररूप धारण केले आहे. अशा स्थितीत देशातील आरोग्यव्यवस्थाही कमी पडत आहे. ऑक्सिजन सिलेंडर, रेमडेसिवर इंजेक्शन आणि रुग्णासाठी बेड, या सर्व गोष्टींचा मोठा तुटवडा भारतात निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यातील आरोग्य प्रशासनावर प्रचंड ताण निर्माण झाला आहे.

1 मेपासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. मात्र लस मिळणार नाही या भीतीने अनेक केंद्रांवर नागरिकांची गर्दी होत आहे. मात्र या गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका वाढला आहे.

अशातच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. यात एक तरुणी लस घेण्यासाठी गेली आहे, मात्र ती इतकी घाबरत आहे, की डॉक्टरही अक्षरशः हैराण झाले.

व्हिडीओमध्ये दिसत आहे, की ही मुलगी खुर्चीवर बसली आहे. डॉक्टर हातामध्ये इंजेक्शन घेऊन जवळ येताच ती तरुणी घाबरते आणि एक मिनिट थांबण्यासाठी सांगते. नर्स तिला पकडून ठेवतात. यानंतर ती जोरानं ओरडू लागते. शेवटी वैतागून डॉक्टर तिला जाण्यासाठी सांगतात.

यानंतर ती डॉक्टरला लस देण्यासाठी म्हणू लागते. डॉक्टर इंजेक्शन देऊ लागताच ती विचारते, की मम्मी म्हणून तर ओरडू शकते ना. यावर उत्तर देत डॉक्टर सांगते, की काहीच बोलू नको, शांत बस. इंजेक्शन देताच डॉक्टर तिला रागावून इथून निघ असं सांगतात.

ट्विटरवर लॉजिकल थिंकर नावाच्या एक यूजरनं या घटनेचा व्हिडिओ 3 मे रोजी शेअर केला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. याशिवाय 8 हजारहून अधिक जणांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. तर, तीन हजाराहून अधिकांनी रिट्विटही केला आहे.

दरम्यान, देशात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढताना दिसून येतोय. ऑक्सिजनचा तुटवडा, रेमडेसिवर इंजेक्शन आणि रुग्णासाठी बेड, या सर्व गोष्टींचा तुटवडा सध्या भासतोय. त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

राज्यात दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढतच चालली आहे. यामुळे नियमांचं पालन न करणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई केली जात आहे. अशा संकट काळात अनेक लोक पुढे येत सढळ हातानं मदत करत आहेत.

 

महत्वाच्या बातम्या – 

कोरोना काळात गरीबांसाठी मदत; ‘ही’ अभिनेत्री…

कोरोना रुग्ण दारू पिऊन फिरत होता काॅलनीत; त्यानंतर रुग्णाचा…

‘औषधांचा काळाबाजार करणार्‍यांना भर रस्त्यात चोपला पाहिजे’,…

6 महिन्यांच्या बाळासह 80 वर्षांच्या आजोबांपर्यंत कुटुंबातील…

जाणून घ्या! शरिरातील ऑक्सिजन पातळी वाढवायची असेल तर करा…