सरकार जोरात कामाला लागलंय… पाच वर्ष पूर्ण करणारच- संजय राऊत

मुंबई |  गेले अनेक दिवस शिवसेनेची रोखठोक भूमिका शिवसेना नेते संजय राऊत मांडत आहे. त्यांनी अनेकदा ट्वीट करून त्यांची भूमिका स्पष्ट केलीये. तर कधी ट्वीट करून विरोधी पक्षांवर टीकेची झोड उठवलीये. आज त्यांनी ट्वीट करत सरकार जोरात कामाला लागलंय आणि महाविकास आघाडीचं सरकार 5 वर्ष पूर्ण करणारच, असा विश्वास व्यक्त केला आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं सरकार बनविण्यात संजय राऊत यांचा मोठा वा़टा आहे. अनेक घड़ामोडींनंतर 28 नोव्हेंबरला नव्या सरकारच्या मंत्र्यांनी शपथ घेतली. याच सरकारला लवकरच 100 दिवस पूर्ण होतील आणि 100 दिवस पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रामजन्मभूमी अयोध्येला जाणार आहे, असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.

रामजन्मभूमी अयोध्येला जाऊन उद्धव ठाकरे पुढील कार्याची दिशा ठरवणार आहेत, असं सांगायला देखील राऊत विसरले नाहीत. दुसरीकडे येत्या काही दिवसांतच रामजन्मभूमीचं काम सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्धव यांचा अयोध्या दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.

कुणी कितीही वेळा म्हटलं की सरकार पाच वर्ष पूर्ण करणार तरी हे तीन चाकांचं सरकार आहे आणि त्या प्रत्येक चाकाचं तोंड वेगवेगळ्या दिशेला आहे. त्यामुळे हे सरकार 5 वर्ष चालू शकत नाही, अशी टीका भाजपने केली आहे.

 

 

महत्त्वाच्या बातम्या-