जाणून घ्या मनुका खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे

मनुक्यांमध्ये अनेक पोषक घटक असतात. आयुर्वेदामध्ये मनुक्याला उपयुक्त औषधी मानले गेले आहे. मनुका दिसायला छोटा आहे परंतु शरीरासाठी भरपूर लाभदायक आहेत. मनुक्यात फायबर्स, प्रोटिन्स, अॅंटी आॅक्सिडन्ट, व्हिटामिन्स आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. मनुका खाल्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.

मनुक्यामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करण्याची क्षमता असते. त्यामुळेच ताप आल्यावर मनुके खावेत. ताप लवकर उतरण्यासाठी मनुक्याचे सेवन करणे फायद्याचे ठरते.

मनुक्यामध्ये बीटा कॅरोटीन बऱ्याच मोठ्या प्रमाणत असते. डोळ्यांच्या आरोग्यासाठी बीटा कॅरोटीन फायद्याचे ठरते.  त्यामुळे नजर सुधारण्यासाठी डोळ्यांच्या आरोग्यासाठी मनुक्याचे सेवन करावे.

मनुक्याचे सेवन केल्यानं हाडे मजबूत होण्यास मदत होते. सांधेदुखी, गुडघेदुखीचा त्रास होत असेल तर मनुके खाणे फायदेशीर ठरते. मनुक्यामध्ये कॅल्शियमची मात्रा अधिक असते. म्हणून ज्वॉइंट पेनपासून बचाव होतो.

मनुक्यामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असल्याने रक्तासंदर्भातील आजारांवर मनुका गुणकारी ठरतो. रात्री पाण्यात भिजत ठेवलेला मनुका सकाळी खालल्यास रक्ताच्या कमतरता संदर्भातील अॅनिमिया आजार काही प्रमाणात कमी होण्यास मदत होते.

मनुका हार्ट अटॅकच्या आजारांमध्ये इफेक्टिव आहे. रात्री पाण्यात भिजत ठेवलेला मनुका सकाळी खालल्यास रक्ताच्या कमतरता संदर्भातील अॅनिमिया आजार काही प्रमाणात कमी होण्यास मदत होते.

मनुक्यातील फासबर्समुळे पोट साफ होण्यास मदत होते. मनुक्यांचे नियमित सेवन केल्यानं पचनक्रिया सुधारते. त्याचबरोबर पोटदुखी समस्या दूर होते.

महत्वाच्या बातम्या –

याच महिन्यात लाँच होणार मारुतीची ही बेस्ट सेलिंग कार; केलेत हे महत्त्वाचे बदल!

    ‘हा’ व्यवसाय सुरु करा, दरमहा 70 हजार कमवा; सरकारही करतंय मदत!

      मद्यप्रेमींसाठी गुडन्यूज… आता रात्री उशिरापर्यंत बसता येणार!

        स्टेजवर नवरदेवानं उचललं धक्कादायक पाऊल, नवरीही झाली आऊट ॲाफ कंट्रोल, पाहा Video

          पिल्लाचा जीव वाचवण्यासाठी मगरीच्या जबड्यात गेली आई, पाहा धक्कादायक व्हिडीओ