पावसाचे भयानक वास्तव! मुंबईमध्ये नाल्यात 2 घरे कोसळली, एका महिलेसह दोन मुली बेपत्ता

मुंबई | राज्यात दडी मारून बसलेल्या पावसाने आता आपलं तोंड वर काढलं आहे. गेल्या 24 तासात राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस चालू आहे. मुंबईसह काही जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्याबरोबरच आता पावसामुळे हानी झाल्याच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत.

आज मुंबईतील सांताक्रूझ भागातील वाकोल्या परिसरात नाल्यालगत असणारी दोन घरे पावसाने कोसळली आहेत. यामुळे 1 महिला आणि 3 मुली नाल्यात पडल्या होत्या. आसपासच्या नागरिकांमुळे एका मुलीला नाल्यातून काढण्यात यश मिळालं आहे.

उर्वरित 1 महिला आणि 2 मुली नाल्यात वाहून गेल्या आहेत. सध्या घटनास्थळावर अग्निशमन दलाचे जवान पोहचले असून शोधकार्य सुरू आहे. तर जखमी मुलीला मुंबईतील ‘वी इन देसाई’ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

दरम्यान, प्रशासनानं मुंबईसह काही जिल्ह्यांत रेड अलर्ट जारी केला आहे. गेल्या 24 तासात अरबी समुद्रातही वादळी वाऱ्यासह महाकाय लाटा उसळू लागल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-

पुणे हादरलं! 45 वर्षीय महिलेवर बलात्कार करत लाखाचे दागिने लुटले

भूमिपूजनासाठी ‘विधर्मी’ नको; हिंदू महासभेनं अमित शहांना धाडलं रक्ताने लिहिलेलं पत्र

पुणेकरांनो काळजी घ्याच! पुण्यातील ‘या’ रुग्णालयातून समोर आलं धक्कादायक वास्तव!

मिशन राम मंदिर पु्र्ण आता आता लक्ष्य…; भाजपच्या धडाडीच्या नेत्याचं खळबळजनक वक्तव्य

मुख्यमंत्र्यांनंतर आता विरोधी पक्ष नेत्यालाही झाली कोरोनाची लागण!