करिना नेपोटीजमवर बोलली अन् कंगनाची सटकली; अन् मग काय…

मुंबई | सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूप्रकरणामुळे बॉलीवूड इंडस्ट्रीतील वातावरण चांगलंच तापलं आहे. बॉलीवूड इंडस्ट्रीतील अनेक स्टार किड्सवर घराणेशाहीचे आरोप करण्यात आले होते. हाच आरोप करिना कपूरवरही करण्यात आला होता.

करिना आत्तापर्यंत या मुद्द्यावर शांत होती. मात्र, आता अभिनेत्री करिना कपूर सुशांतच्या मृत्यूप्रकरणात उडी घेत नेपोटीजमवर बोलली आहे. त्यामुळे चिडलेल्या कंगना रनौतने ट्विटरच्या माध्यमातून तिच्यावर प्रश्नांचा भडिमार केला आहे.

करिना कपूर नुकतंच एका मुलाखतीत म्हटली होती, ‘घराणेशाहीमुळे मी इंडस्ट्रीमध्ये आले असेलही पण फक्त या जोरावर माझे 21 वर्षाचे करिअर घडले नसते. कदाचित तुम्हाला ऐकायला नवल वाटेल पण मी सुद्धा स्ट्रगल केला आहे. मी आज जे काही आहे ते प्रेक्षकांमुळेच. आज जे लोक आमच्यावर आरोप करतात त्यांनीच आम्हाला स्टार बनवले. त्यामुळे अनेकदा मला हा वादच निरर्थक वाटतो.’

करिनाच्या या वक्तव्यामुळे कंगना रनौत चांगलीच भडकली आहे. कंगणाच्या टीमने करिणाला एकापाठोपाठएक ट्विट करत धारेवर धरलं आहे. त्याबरोबरच करिनाला ‘कृपया या प्रश्नांची उत्तरं देशील का?’ असं म्हणत सहा प्रश्न विचारले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

पावसाचे भयानक वास्तव! मुंबईमध्ये नाल्यात 2 घरे कोसळली, एका महिलेसह दोन मुली बेपत्ता

पुणे हादरलं! 45 वर्षीय महिलेवर बलात्कार करत लाखाचे दागिने लुटले

भूमिपूजनासाठी ‘विधर्मी’ नको; हिंदू महासभेनं अमित शहांना धाडलं रक्ताने लिहिलेलं पत्र

पुणेकरांनो काळजी घ्याच! पुण्यातील ‘या’ रुग्णालयातून समोर आलं धक्कादायक वास्तव!

मिशन राम मंदिर पु्र्ण आता आता लक्ष्य…; भाजपच्या धडाडीच्या नेत्याचं खळबळजनक वक्तव्य