“केंद्राची सुरक्षा नसती तर आज सोमय्यांना श्रद्धांजली वाहावी लागली असती”

मुंबई | मागील काही दिवसांपासून शिवसेनेवर सात्त्याने भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या किरीट सोमय्यांना आज शिवसैनिकांच्या रोषाचा सामना करावा लागला. पुणे महानगरपालिकेच्या आवारात आज मोठा हायवोल्टेज ड्रामा पहायला मिळाला.

पुण्यातील कोविड सेंटरमध्ये झालेल्या कथित भ्रष्टाचारावर खुलासा करण्यासाठी किरीट सोमय्या आज पुणे महानगरपालिकेत पोहचले होते. त्यावेळी शिवसैनिकांनी त्याठिकाणी जोरदार राडा घातला.

पुणे महापालिकेच्या इमारतीत प्रवेश करताना इमारतीत शिवसेना कार्यकर्त्यांनी त्यांना घेरलं आणि घोषणाबाजी सुरू केली. त्यावेळी घोळक्यातून बाहेर पडताना किरीट सोमय्या पायऱ्यावरून पडले.

किरीट सोमय्या यांनी या घटनेनंतर जवळच्या संचेती रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांंत पाटील सोमय्यांच्या प्रकृतीबाबत विचारपूर करण्यासाठी गेले.

त्यावेळी माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटलांनी गंभीर आरोप लगावले आहेत. किरीट सोमय्या यांना ठार मारण्याचा हेतू होता, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

पुणे महापालिकेची सुरक्षा कुठे होती? पोलीस कुठे होते? असा सवाल देखील चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केलाय. एकजण दगड घेऊन धावत होता. सोमय्यांना मारण्याची पूर्ण योजना झाली होती, असा खळबळजनक दावा देखील त्यांनी केला आहे.

सत्य लपणार नाही. सोमय्या यांच्या हाताला दुखापत झालीये. कंबरेला मार लागला आहे. त्यांना ठार मारण्याचाच हेतू होता, असं वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी केलं आहे.

दरम्यान, केंद्राची सुरक्षा नसती तर आज सोमय्यांना श्रद्धांजली व्हावी लागली असती, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

बापासाठी चिमुकली ढसाढसा रडली; पाहा डोळ्यात पाणी आणणारा व्हिडीओ

 प्रसिद्ध मराठी अभिनेत्री किशोरी शहाणेंच्या गाडीचा भीषण अपघात, कार उद्ध्वस्त

 ना विराट ना माॅरिस, ‘हा’ ठरलाय IPL सामन्यातील सर्वात महागडा खेळाडू

“इस शॉट को क्या नाम दूं?”, राशिद खानने फिरवली बॅट अन्…; पाहा व्हिडीओ

 आमदार नितेश राणेंची तब्येत पुन्हा बिघडली, आता रुग्णवाहिकेने कोल्हापूरला नेणार