वर्ल्ड कप फायनलमध्ये पठ्ठ्याची भेदक गोलंदाजी, आईला दिलेला शब्द अखेर खरा ठरवला

नवी दिल्ली | भारतीय वरिष्ठ क्रिकेट संघ सध्या खराब प्रदर्शनामुळं सर्वांच्या निशाण्यावर आहे. अशातच भारताच्या युवा संघानं मात्र आपल्या कामगिरीनं सर्वांना अचंबित केलं आहे. भारतीय अंडर-19 संघ इंग्लंडसोबत फायनल खेळत आहे.

भारतीय अंडर-19 संघानं आतापर्यंत विक्रमी पाचवेळा विश्वचषक जिंकला आहे. परिणामी आता यावेळी भारतीय संघ जिंकून विश्वचषक विजयाचा षटकार मारण्याचा इरादा घेऊन खेळत आहे.

भारतीय संघाला फायनलपर्यंत पोहोचवण्यात सर्व खेळाडूंनी आपापला वाटा उचलला आहे. भारतीय संघाची घातक गोलंदाजी ही आतापर्यंत भारताच्या जमेची बाजू म्हणून सामोर आली आहे.

वेगवान भारतीय गोलंदाज रवी कुमार या स्पर्धेत प्रतिस्पर्ध्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. रवीनं पाच सामन्यात सहा विकेट घेतल्या आहेत. अंतिम सामन्यात सामन्याच्या सुरूवातीलाच रवीनं इंग्लंडच्या कर्णधाराला त्रिफळाचित केलं आहे.

रवी कुमारचा क्रिकेटर बनण्याचा प्रवास सोपा नक्कीचं नव्हता. रवीने अनेक अडचणींचा सामना करत करत आपल्या कौशल्यात वाढ केली आहे. रवीचे वडील सीआरपीएफमध्ये असिस्टंट सबइंस्पेक्टर आहेत. देश सेवेत असणाऱ्या एका जवानाच्या मुलानं देशाला अभिमान वाटावा अशी कामगिरी केली आहे.

रवी कुमार भारताच्या अंडर-19 संघाचा वेगवान गोलंदाज म्हणून भाग आहे. रवीनं आपल्या भेदक गोलंदाजीनं दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना जेरीस आणलं होतं.

रवीनं बंगालच्या अंडर-19 संघाकडून खेळताना अप्रतिम कामगिरी केली होती. त्यानंतर रवीला भारतीय संघात सामिल करण्यात आलं होतं. रविनं भारतीय संघाकडून खेळताना आशिया कप आणि चॅम्पियन्स ट्राॅफिमध्ये चमकदार कामगिरी केली आहे.

अभ्यास सोडून खेळावर लक्ष दिल्यामुळं रवीला आपल्या आईकडून भरपूर वेळा चांगलाच समाचार मिळाला आहे. पण रवीनं घरच्यांना त्याच्या खेळाबद्दल सांगितल्यावर घरच्यांनी त्याला खेळण्यास मुभा दिली.

रवी नेहमी त्याच्या आईला म्हणायचा, आज तू मला खेळण्यापासून थांबवत आहेस, पण एक दिवस मी टीव्हीवर येईन. रवीने आईला सांगून ही गोष्ट खरी करून दाखवली आहे.

दरम्यान. भारतीय संघाच्या विजयामध्ये रविनं अनेकदा मोलाचा वाटा उचलला आहे. सुरूवातीच्या षटकांमध्ये विरोधी संघावर दबाव बनवण्यात रवी यशस्वी ठरत आहे. परिणामी येणाऱ्या काळात तो एक घातक गोलंदाज म्हणून ओळखला जाण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री किशोरी शहाणेंच्या गाडीचा भीषण अपघात, कार उद्ध्वस्त

 ना विराट ना माॅरिस, ‘हा’ ठरलाय IPL सामन्यातील सर्वात महागडा खेळाडू

“इस शॉट को क्या नाम दूं?”, राशिद खानने फिरवली बॅट अन्…; पाहा व्हिडीओ

 आमदार नितेश राणेंची तब्येत पुन्हा बिघडली, आता रुग्णवाहिकेने कोल्हापूरला नेणार

 मोठी बातमी! लता मंगेशकर यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर