पुणे : हिंदू, हिंदुत्व आणि हिंदुस्थान ही संकल्पना देशासाठी घातक आहे. मी देखील हिंदू असून देशासाठी हिंदू हा एक धर्म आहे. परंतु भाजपाची हिंदुत्व ही राजकीय विचारधारा असताना, आपल्या देशात मागील काही महिन्यांमध्ये जमावाकडून झालेल्या झुंडशाहीसारखी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. त्या माध्यमातून हा हिंदू धर्माचा आणि प्रभू श्री रामाचा अपमानच आहे, अशी भूमिका काँग्रेस पक्षाचे खासदार शशी थरूर यांनी मांडली.
पाकव्याप्त काश्मीरमध्ये 75 टक्के नागरिक पंजाबी असून तेथील सद्य परिस्थिती लक्षात घेता पाकिस्तानला त्या संदर्भात बोलण्याचा अधिकार नसल्याचे त्यांनी सांगितले. परंतु, काश्मीरमध्ये मोदी सरकारने 370 कलम ज्या पद्धतीने हटवले त्याबाबत आम्ही त्यांना प्रश्न विचारणारच आणि त्यांना त्या सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील, असंही शशी थरूर यांनी स्पष्ट केलं आहे.
प्रभू श्रीराम यांनी देशाला ही शिकवण दिली आहे का?,असा सवालही त्यांनी उपस्थित केला. आगामी काळात आर्थिक स्थिती खूप भयानक होईल आणि देश कोणत्या दिशेने जाईल हे सांगता येणार नाही, असंही ते म्हणाले.
देशासमोर मंदीचे संकट असून अनेकांचा रोजगार गेला आहे, तरीही सरकारकडून कोणताही मंत्री पुढे येऊन बोलण्यास तयार नाही. तर मोदींनी मन की बात ऐवजी जन आणि धन की बात बोला, अशा शब्दात काँग्रेस पक्षाचे खासदार शशी थरूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.
दरम्यान, पुण्यातील काँग्रेस भवन येथील कार्यक्रमानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना शशी थरूर यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
रामयणातील ‘त्या’ प्रश्नावरुन ट्रोल करण्याऱ्यांना सोनाक्षीने दिलं ‘हे’ उत्तर- https://t.co/Xl96DnIabk @sonakshisinha
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 22, 2019
ठरलं…. कलम 370 मुद्द्यावरूनच विधानसभेचा प्रचार करायचा! https://t.co/q5SywBIV3Q @BJP4Maharashtra @AmitShah
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 22, 2019
…म्हणून सोनाक्षी सिन्हाला सोशल मीडियावर केलं ट्रोल – https://t.co/mmzw1MXnaG @sonakshisinha
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 22, 2019