सुप्रसिद्ध अभिनेत्री ते शेवटी वेश्या कोण होती ही अभिनेत्री? वाचा सविस्तर

दररोज हजारो युवक युवती मुंबई या स्वप्नांच्या शहरात आपलं लक आजमवण्यासाठी येत असतात. मात्र, यातील सर्वांचीच साथ नशीब देतं असं नाही. यातील खूप थोडे लोक या चित्रपट सृष्टीत यशाच्या शिखरावर पोहचत असतात. चित्रपट सृष्टीला एक जु.गार म्हणलं जातं. ही सृष्टी अनेकांचं लाईफ बनवत जरी असली तरी तितक्याच जास्त लोकांचं आयुष्य बरबाद देखील करत असते.

आज अशाच रातोरात स्टार बनलेल्या एका अभिनेत्रीचा जिवनप्रवास आपण जाणून घेवूयात. 90च्या दशकात अभिनेत्री विमी यांनी आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने सर्वांनाच भुरळ घातली होती. विमी या मुळच्या पंजाब या राज्यातील रहिवाशी होत्या. एका पार्टीसाठी विमी कोलकत्ता येथे आल्या होत्या. यावेळी एका म्युजिक डायरेक्टरने विमी यांना पाहिले आणि थेट मुंबई येथे येण्याचे निमंत्रण दिले.

विमी यावेळी विवाहित होत्या. मात्र, तरी देखील विमी यांनी मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला. यानंतर दिग्दर्शक बी आर चोपडा यांनी ‘हमराज’ या चित्रपटासाठी मुख्य नाईका म्हणून विमी यांना निवडले आणि इथूनच विमी यांच्या फिल्मी करिअरची सुरुवात झाली.

हमराज चित्रपटातील विमी यांचा अभिनय आणि सौंदर्य पाहिल्यानंतर अनेक मोठ मोठ्या चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी विमी यांना मिळाली. विमी या काळात यशाच्या शिखरावर होत्या. मात्र, सुरुवातीला विमी यांना पाठींबा देणारे त्यांचे कुटुंब नंतर त्यांच्या फिल्मी करिअरला विरोध करू लागले.

यानंतर विमी यांच्या करिअरमध्ये त्यांचे पती देखील हस्तक्षेप करू लागले आणि विमी यांच्या करिअरला उतरती कळा लागली. विमी यांच्या पतीमुळे अनेक मोठ मोठे प्रोजेक्ट विमी यांच्या हातातून गेले. या काळात विमी यांना प्रचंड आर्थिक अडचणींचा देखील सामना करावा लागला.

आर्थिक अडचणी भासू लागल्यानंतर विमी यांनी स्वतःचे अंगप्रदर्शन करून पैसे कमवण्यास सुरुवात केली. या काळात त्यांनी आपले राहते घर आणि गाडी देखील विकली. फिल्मी करिअर पूर्णपणे बाद झाल्यानंतर विमी आपल्या पतीला सोडून एका व्यक्तीसोबत राहत असल्याची माहिती देखील समोर आली होती.

पतीला सोडून ज्या व्यक्तीसोबत विमी राहत होत्या. त्या व्यक्तीने देखील विमी यांचा पूर्णपणे वापर करून घेतला आणि नंतर त्यांना सोडून दिले. आयुष्यात आलेल्या अपयशाने विमी खूप खचून गेल्या होत्या. या काळात त्या अनेक व्यसनांच्या देखील आहारी गेल्या होत्या. शेवटी तर पैसे मिळवण्यासाठी त्यांनी वे.श्या व्यवसाय देखील सुरु केला.

या काळात विमी यांना अनेक गंभीर आजारांनी ग्रासलं. मुंबई येथे असणाऱ्या नानावटी रुग्णालयात विमी यांच्यावर उपचार देखील चालू होत. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृ.त्यू झाला. विमी यांच्या मृ.त्युनंतर काही अनोळखी लोकांनी विमी यांचा मृ.तदेह हातगाड्यावर टाकून नेला आणि त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.

महत्त्वाच्या बातम्या-

अर्णबला अ.टक करण्यासाठी ठरला होता मोठा प्लॅन; जाणून घ्या सर्व माहिती

‘जो बायडन’ असतील अमेरिकेचे पुढील राष्ट्राध्यक्ष? पाकिस्तानला होणार ‘हा’ फायदा

उत्तर प्रदेशमध्ये पत्रकार मारले गेल्याच्या घटनेची आठवण करून देत शिवसेनेचा भाजपवर घणाघात!

‘या’ बड्या अभिनेत्रीने स्वतःच्या वडिलांविषयीच केला धक्कादायक खुलासा! म्हणाली माझ्या वडिलांनीच मला…

अर्णव गोस्वामी यांच्यानंतर आता त्यांच्या पत्नीलाही अ.टक होणार?