अर्णबला अ.टक करण्यासाठी ठरला होता मोठा प्लॅन; जाणून घ्या सर्व माहिती

मुंबई | अलिबाग पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना ता.ब्यात घेतलं आहे. इंटेरिअर डिझाईनर अन्वय नाईक आ.त्मह.त्याप्रकरणी कलम 306 च्या अंतर्गत पोलिसांनी अर्णव गोस्वामींला अ.टक केलं आहे.

अर्णव यांच्या वरळी येथील राहत्या घरातून सचिन वाझे यांच्या पथकाने त्यांना अ.टक केलं आहे. गोस्वामी यांनी अन्वय नाईक यांना आ.त्मह.त्येसाठी प्रवृत्त केलं असल्याचा आ.रोप नाईक यांच्या कुटुंबियांनी केला होता. काही दिवसांपूर्वीच याप्रकरणी गोस्वामी यांच्यावर गु.न्हा दाखल करण्यात आला होता. अर्णव गोस्वामींला अटक करण्यासाठी अगोदरच तयारी करण्यात आली होती, अशी माहिती आता समोर आली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस नेते अनिल देशमुख यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या गृह विभागाने अर्णव गोस्वामी यांच्या अट.केची तयारी केली होती. यासाठी कोकण रेंजचे आयजी संजय मोहिते यांच्या नेतृत्वाखाली तब्बल 40 पोलीस कर्मचाऱ्यांची टीम नियुक्त करण्यात आली होती.

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण रिओपन करण्यासाठी रायगड पोलिसांनी परवानगी दिल्यानंतर या ‘ऑपेरेशन अर्णव’ची तयारी सुरु झाली होती. ऑपरेशन अर्णवसाठी नियुक्त करण्यात आलेल्या 40 पोलिसांच्या यादीत रायगड पोलिसांसह मुंबई पोलिसांचा देखील समावेश करण्यात आला होता.

अर्णव गोस्वामी यांच्या अट.केची योजना मोहिते यांनी तयार केली होती. तर तयार केली गेलेली मोहीम योग्यरित्या पार पाडण्याची जबाबदारी एनकाउंटर स्पेशलिस्ट सचिन वाझे यांच्यावर सोपविण्यात आली होती. कॅबिनेट मधील एका वरिष्ठ सदस्याने याप्रकरणी माध्यमांना गुप्त माहिती दिली आहे.

अर्णव गोस्वामी हे अतिशय शक्तिशाली पत्रकार आहेत. अर्णव गोस्वामी यांना अ.टक करण्याचा प्लॅन मोहिते यांच्या नेतृत्वाखाली प्रत्यक्षात आणणे खूप जोखमीचे आणि आव्हानात्मक काम होते. टीम मधील प्रत्येकच सदस्याने संयम बाळगत आणि सावधगिरीने काम केले आहे, असं या वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटलं आहे.

दरम्यान, अन्वय नाईक यांनी रिपब्लिक टीव्ही चॅनेलच्या स्टुडीओच्या इंटेरिअर डिझाईनचे काम केले होते. या कामाचे जवळपास नाईक यांना अर्णव गोस्वामी यांच्याकडून 5 कोटी 40 लाख रुपये येणे होते. मात्र, वारंवार पैसे मागूनही अर्णव गोस्वामी नाईक यांचे पैसे देत नव्हते. यामुळे अन्वय नाईक प्रचंड मानसिक तणावाखाली गेले होते.

यानंतर 5 मे 2018 रोजी नाईक यांनी अलिबाग जवळील काविर गावात त्यांच्या राहत्या घरी आ.त्मह.त्या केली. नाईक यांच्यानंतर त्यांच्या आईने देखील आ.त्मह.त्या केली होती. मात्र, आ.त्मह.त्या करण्यापूर्वी नाईक यांनी एक पत्र लिहून ठेवलं होतं.

या पत्रात अन्वय नाईक यांनी रिपब्लिक टीव्हीचे मालक अर्णव गोस्वामी, फिरोज शेख आणि नितेश सारडा यांनी आपल्या कामाचे पैसे न दिल्यानं आपण आ.त्मह.त्या करत असल्याचं म्हटलं होतं. याप्रकरणी अन्वय यांची पत्नी अक्षता नाईक यांनी गोस्वामी यांच्या विरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात त.क्रार दाखल केली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

‘जो बायडन’ असतील अमेरिकेचे पुढील राष्ट्राध्यक्ष? पाकिस्तानला होणार ‘हा’ फायदा

उत्तर प्रदेशमध्ये पत्रकार मारले गेल्याच्या घटनेची आठवण करून देत शिवसेनेचा भाजपवर घणाघात!

‘या’ बड्या अभिनेत्रीने स्वतःच्या वडिलांविषयीच केला धक्कादायक खुलासा! म्हणाली माझ्या वडिलांनीच मला…

अर्णव गोस्वामी यांच्यानंतर आता त्यांच्या पत्नीलाही अ.टक होणार?

सुशांत प्रकरणी मोठी बातमी! रियाच्या वकिलांनी केला ‘त्या’ प्रायव्हेट गोष्टीचा खुलासा