राज्यपाल नियुक्त सदस्यांची नावे राज्यपालांकडे सोपविताच राऊतांचा राज्यपालांसह भाजपवर निशाणा म्हणाले…

मुंबई| महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या नावाची यादी नुकतीच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सादर केली आहे. यामुळे विधान परिषदेच्या ज्या 12 सदस्यांच्या जागा रिक्त होत्या त्या लवकरच भरल्या जातील अशी अपेक्षा आहे. राज्यपालांकडे यादी सोपविल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे सुज्ञ आहेत. राज्यपालांवर आमचं प्रेम आहे आणि त्यांचंही आमच्यावर प्रेम आहे. त्यामुळे ते महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिलेली राज्यापाल नियुक्त 12 सदस्यांची नावं नाकरणार नाहीत, अशी खोचक प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

राज्यपालांवर आमचं प्रेम आहे आणि त्यांचंही आमच्यावर प्रेम आहे. ते किती प्रेम आहे हे देशाला माहिती आहे. याच प्रेमातून यापुढे सर्व कारभार सुरळीत होईल. आम्ही राज्यपालांचा नेहमी आदर करतो. राज्यपाल घटनेच्या विरुद्ध काम करणार नाहीत. ते 12 जणांची यादी नाकारणार नाहीत, असे संजय राऊत म्हणाले आहेत.

शिवसेनेच्या यादीत अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचे नाव आहे. देशाबाबत माहिती असणारी अभिनेत्री विधान परिषदेवर गेली तर उत्तमच आहे. ती कोणताही राजकीय अडथळा निर्माण करणारी नाही, असंही संजय राऊत यांनी म्हटले आहे.

तसेच यावेळी राऊत म्हणाले की, राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी तिन्ही पक्षांनी दिली आहे. आता निर्णय राज्यपाल घेणार आहेत. महाराष्ट्राचे सरकार हे लोकशाही मार्गाने घटनात्मक पूरक कायद्याचा आधार घेऊन सत्तेत आले. राज्यपाल घटनात्मक प्रमुख आहेत. त्यांच्या मताचा आम्ही आदर करतो.

यावेळी राऊत यांनी बिहार निवडणुकीबाबत देखील भाष्य केलं आहे. बिहार निवडणुकीबाबत बोलताना त्यांनी तेजस्वी यादव यांचे तोंडभरून कौतुक केले. तसेच मुख्यमंत्री नितीश कुमारांवर टीकाही केली.

तेजस्वी यादवांकडून खूप अपेक्षा आहेत. त्यांच्याकडून परिवर्तनची आस आहे. तसेच नितीशकुमार यांचा आम्ही आदर करतो. मात्र, आता नितीशकुमार यांना सन्मानपूर्वक बिदाई द्यायला हवी, असंह राऊत यावेळी म्हणाले.

अमेरिकेतील निवडणुकीबाबत बोलताना राऊत म्हणाले की, भारतातील लोकशाही मजबूत आहे. अमेरिकेतील तमाशा हिंदुस्थानात होणार नाही. इंदिरा गांधी हरल्यावर 10 मिनीटात राजीनामा देऊन घरी गेल्या होत्या. भारतीय लोकशाही परिपक्व आहे.

तसेच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून कधी चांगले नेतृत्व झाले नाही त्यामुळे त्यांच्याकडून काय अपेक्षा असणार. हरल्यावर हे खुर्ची सोडू शकत नाहीत, अशीही टीका संजय राऊत यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

डोनाल्ड ट्रम्प यांना दुसरा मोठा झटका! पत्नी मेलानिया लवकरच घेणार घटस्फो.ट?

“पोलिसांनी आज सकाळी मला पुन्हा मारलं, माझा जीव धोक्यात आहे”

जो बायडन यांना शुभेच्छा देत रोहित पवारांचा भाजपवर जोरदार निशाणा!

कंगना पुन्हा बरळली! थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना गजनीची उपमा देत म्हणाली…

‘माझा नवरा बॉलीवूडच्या ‘या’ अभिनेत्रींना…’; स्वतःच्या पतीविषयीच अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा!