ठाकरे सरकारमधील मंत्र्यांनी घेतली राज्यपालांची भेट; समोर आलं ‘हे’ कारण

मुंबई | विधानपरिषदेवरील राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा मुद्दा गेल्या दोन वर्षापासून चर्चेचा विषय ठरत आहे. महाविकास आघाडी पक्षांनी या मुद्द्यावरून भाजप आणि राज्यपालांवर टीका केली होती.

भाजपच्या आमदारांच्या निलंबनाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात देखील गेला होता. अशातच आता हा आघाडीच्या आमदारांचा तिढा सुटण्यासाठी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांनी राज्यपालांची भेट घेतली आहे.

त्याचबरोबर विधानसभा अध्यक्ष निवडणुकीबाबत देखील चर्चा करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीसाठी राज्यपालांकडे तारीख देण्याची विनंती मंत्र्यांनी यावेळी राज्यपालांकडे केली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, छगन भुजबळ, जयंत पाटील, सुभाष देसाई, अनिल परब, अशोक चव्हाण, सतेज पाटील यांनी राज्यपालांची भेट घेतली.

राज्यपाल कोश्यारी यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली आहे. त्यांच्याकडून सकारात्मक उत्तर येण्याची अपेक्षा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची यादी महाविकास आघाडीतर्फे राज्यपाल यांच्याकडे बंद पाकिटात पाठवण्यात आली आहेत.

दरम्यान, आता राज्यपाल या काय निर्णय घेणार? याकडे भाजपसह महाविकास आघाडीत पक्षांचं लक्ष लागलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

धोनीनं केलं ट्रॅफिक जॅम! भर रस्त्यात उभी केली बस अन्…; पाहा व्हिडीओ

“भाजपमुक्तीचा ‘लातूर पॅटर्न’ राज्याच्या कानाकोपऱ्यात राबवा”

 ठाकरे सरकारचा एसटी कर्मचाऱ्यांना दणका; विलिनीकरणाबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय

“भांडणं करण्याऐवजी, एकत्र येऊया आणि ओबीसी आरक्षणाचा विषय सोडवू” 

घरभाड्याच्या बदल्यात सेक्स, ‘या’ देशात दिली जातेय सेक्स फॉर रेंटची ऑफर