मोठी बातमी! मोदी सरकार ‘या’ दोन कंपन्यांची मालमत्ता विकणार

नवी दिल्ली | डिपार्टमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड पब्लिक अॅसेट मॅनेजमेंटच्या वेबसाईटवर अपलोड केलेल्या दस्तऐवजानुसार सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपन्या MTNL आणि BSNL च्या नॉन-कोर अॅसेट कमाईची यादी सुमारे 1,100 कोटी रुपयांच्या राखीव किमतीवर विक्रीसाठी ठेवलीय.

BSNL च्या मालमत्ता हैदराबाद, चंदीगड, भावनगर आणि कोलकाता येथे आहेत आणि विक्रीसाठी त्यांची आरक्षित किंमत 800 कोटी रुपये आहे.

DIPAM वेबसाईटवर MTNL च्या वसारी हिल, गोरेगाव, मुंबई येथे असलेल्या मालमत्ता सुमारे 270 कोटी रुपयांच्या राखीव किमतीत विक्रीसाठी सूचीबद्ध केल्यात.

ओशिवरा येथे MTNL चे 20 फ्लॅट देखील कंपनीच्या मालमत्ता कमाई योजनेचा भाग म्हणून विक्रीसाठी ठेवण्यात आलेत.

राखीव किंमत 52.26 लाख ते 1.59 कोटी रुपये आहे. MTNL मालमत्तेचा ई-लिलाव 14 डिसेंबर रोजी होणार आहे.

MTNL आणि BSNL ची स्थिती सुधारण्यासाठी सरकारने ऑक्टोबर 2019 मध्ये या पुनरुज्जीवन योजनेला मंजुरी दिली होती. या योजनेनुसार, दोन्ही कंपन्यांना 2022 पर्यंत 37500 कोटी रुपयांची मालमत्ता ओळखून दोन्ही कंपन्यांना विकावी लागेल.

BSNL, MTNL च्या 69000 कोटी रुपयांच्या पुनरुज्जीवन योजनेंतर्गत 4G स्पेक्ट्रम वाटप आणि मालमत्ता मुद्रीकरण यांचा समावेश करण्यात आलाय.

याशिवाय दोन्ही कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना व्हीआरएसचा पर्यायही देण्यात आलाय. या दोन्ही कंपन्यांच्या 92700 कर्मचाऱ्यांनी व्हीआरएस घेतलाय. यामुळे दरवर्षी पगाराच्या रूपात 8800 कोटी रुपयांची बचत होणार असल्याचं मानलं जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘या’ पेनी स्टॉक्सने गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दीड वर्षात 1 लाखाचे झाले ‘इतके’ कोटी 

‘त्यावेळी माझी बायको नातवंडांसह दिवसभर…’; छगन भुजबळांनी दिला आठवणींना उजाळा

गोपीचंद पडळकरांची गाडी फोडली; भाजप-राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा

भारताचं आव्हान संपुष्टात! टीम इंडिया वर्ल्ड कपमधून बाहेर

“परमबीर सिंह यांना भाजपने गायब केलं, त्यांचं शेवटचं लोकेशन…”