काय सांगता?; सासूनंच लावून दिलं आपल्या सुनेचं दुसरं लग्न!

भोपाळ | मध्य प्रदेश मधील रतलाम येथे एक अनोखा विवाह पार पडला आहे. लग्नानंतर अवघ्या काही दिवसातच पतीचा मृत्यू झाल्याने त्याची विधवा पत्नी एकटीच राहिली होती. त्यामुळे तिच्या भविष्याचा विचार करून सासुनेच सुनेचं लग्न लावून दिलं आहे.

सरला जैन या रतलाममधील काटजू नगर येथे राहतात. सरला यांचा मुलगा मोहित जैन याचे 8 वर्षांपूर्वी आष्टा येथील सोनमशी लग्न झालं. लग्नानंतर अवघ्या तीन वर्षात मोहित याला कर्करोग झाला. सोनमने त्यानंतर तीन वर्षे आपल्या पतीची सेवा केली. मात्र, कर्करोगामुळे मोहित याचं निधन झालं. त्यानंतर सोनम सासू सासऱ्यांची सेवा करत त्यांची मुलगी म्हणून राहू लागली.

आपल्या मृत्यूनंतर सोनमच्या भविष्याचं काय? हा विचार सोनमच्या सासू सासऱ्यांनी केला. त्या दोघांनी आपल्या विधवा सुनेचं लग्न लावण्याचा निर्णय घेतला. दरम्यान सासूने आपल्या सुनेच्याच वयाच्या नागदा येथील रहिवाशी सौरभ जैनशी तिचे लग्न ठरवलं.

कोरोनाकाळात स्वतःच्या घरी लग्नाची व्यवस्था करून मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत सासूने पोटच्या मुलीप्रमाणे सुनेचं कन्यादान करत तिची पाठवणूक केली. सुनेची पाठवणूक करताना सासूलाही अश्रू अनावर झाले. सध्या संपूर्ण जिल्ह्यात या लग्नाचीच चर्चा चालू आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

पुण्यातील दाम्पत्याला मुलबाळ नव्हतं; लॉकडाऊन उठल्यावर समोर आला धक्कादायक प्रकार

कोरोनाला संपवण्यासाठी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी सांगितला अध्यात्मिक उपाय

पंतप्रधान नरेंद्र मोदी वापरत असलेल्या वस्तूंच्या किंमती ऐकाल तर थक्क व्हाल!

अंगात येतं म्हणून मायलेकाला अघोरी बाबाकडं नेलं; त्यानं जे केलं ते धक्कादायक

सापाचं तो़ंड धरुन जबरदस्ती दुधात बुडवलं, त्यानंतर असा अंगाशी आला ‘हा’ प्रकार!