पुढील चार दिवस राज्यातील ‘या’ भागात जोरदार पावसाची शक्यता

मुंबई | महाराष्ट्रात आजपासून पुढील चार दिवस जोरदार पाऊस होऊ शकतो, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. कोकण, गोवा, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे. राज्यातील काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.

पुणे आणि मुंबईतही पावसाचा अंदाज वर्तवला जात आहे. गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस येण्याची शक्यता आहे. त्याबरोबरच महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस येण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.

मंगळवार 28 जुलै रोजी कोकण आणि गोव्यात बऱ्याच ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. त्याबरोबरच विदर्भातसुद्धा तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकतो.

सोमवारपासून पुढील चार दिवस हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

पुण्यातील दाम्पत्याला मुलबाळ नव्हतं; लॉकडाऊन उठल्यावर समोर आला धक्कादायक प्रकार

कोरोनाला संपवण्यासाठी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी सांगितला अध्यात्मिक उपाय

पंतप्रधान नरेंद्र मोदी वापरत असलेल्या वस्तूंच्या किंमती ऐकाल तर थक्क व्हाल!

अंगात येतं म्हणून मायलेकाला अघोरी बाबाकडं नेलं; त्यानं जे केलं ते धक्कादायक

सापाचं तो़ंड धरुन जबरदस्ती दुधात बुडवलं, त्यानंतर असा अंगाशी आला ‘हा’ प्रकार!