कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नाशिक प्रशासनाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

नाशिक | मागिल काही महिन्यांपूर्वी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला होता. मात्र फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा कोरोना रोगाने डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.

याच पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने नागरिकांसाठी काही निर्बंधही घालून दिले आहेत. त्यामध्ये मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे यांसारख्या नियांमाचा समावेश आहे.

नाशिक जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात चार हजाराहून अधिक कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहे. त्यामुळे नाशिक जिल्हा प्रशासाने याबाबत एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.

त्यानुसार शनिवार आणि रविवार या दोन दिवशी जिल्ह्यातील संपूर्ण बाजारपेठा बंद राहतील. या दरम्यान केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. तसेच या काळात नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला असला असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

या निर्बंधामध्ये 15 मार्चपासून लग्न समारंभ तसेच अन्य कार्यक्रमावरही बंदी घालण्यात आली आहे. पुढील आदेश मिळेपर्यंत मंगल कार्यालय, हॉल यांच्या मालकांनी हॉल देऊ नयेत, असंही प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

शनिवार रविवार पूर्ण दिवस मंदिरं बंद राहतील. इतर दिवशी धार्मिक स्थळे सकाळी सात ते सायंकाळी सात यावेळेत सुरु राहतील. धार्मिक विधीसाठी पाचपेक्षा अधिक व्यक्तींना परवानगी नसेल. खाद्य पदार्थ, बार संध्याकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत सुरु राहतील. मात्र बारमध्ये आसन क्षमतेच्या 50 टक्के ग्राहकांनाच परवानगी देण्यात यावी. तसेच खाद्यपदार्थाची होम डिलेव्हरीही रात्री दहा वाजेपर्यंतच सुरु राहणार आहे.

दरम्यान, संपूर्ण देशात दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात झाली आहे. तरी देखील राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. गेल्या दोन दिवसात राज्यात जवळजवळ 20 हजारांच्या आसपास कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. सध्या राज्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 97 हजार 638 एवढी आहे.

महत्वाच्या बातम्या-

अजित पवारांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर पार्थ पवारांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

अमृता फडणवीस यांचं ‘हे’ नवीन गाणं भेटीला

‘मेसेजवरुन धमक्या कसल्या देताय दम असेल तर समोर या’, धमक्या देणाऱ्याला अभिनेत्रीचं आव्हान

दहावी, बारावीच्या 50 हजारांहून अधिक विद्यार्थांचा ऑफलाईन परीक्षेला नकार…..

अमृता फडणवीसांच्या नवीन गाण्यावर रोहित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले….