मुंबई | राजाचे अर्थसंक्लपीय अधिवेशन झाले आहे. यावरुन विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षांमध्ये आ.रोप-प्रत्यारोपांची खेळी रंगलेली पाहायला मिळत आहेत. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास सरकारचा दुसरा अर्थसंक्लप सादर केला.
अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर विरोधी पक्ष टीका करत आहेत. तर शिवसेनेच्या अग्रलेखातून अजित पवारांचं तोंडभरुन कौतुक केलं जात आहे. अशातच अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
यासंदर्भात त्यांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरुन एक ट्विट केलं आहे. त्यांत त्यांनी र्थसंकल्पाचं कौतुक केलं आहे. या अर्थसंकल्पाचा सर्वसामान्य जनतेला लाभ होईल, असंही त्यांनी म्हटलं आहे.
कोरोना मारामारीमुळे राज्याची अर्थव्यवस्था बिघडली असतानाही, ,सर्व अर्थसंकल्पात विकासाच्या गोष्टींना प्राधान्यक्रम देण्यात आला आहे, असं मत पार्थ पवार यांनी व्यक्त केलं आहे. ही बाब उल्लेखनीय असल्याचं पार्थ पवार म्हणाले.
अजित पावार यांनी 10 हजार 226 कोटींचा तुटीचा अर्थसंकल्प सादर केला आहे. सादर केलेल्या अर्थसंकल्पात आरोग्य, कृषी, महिला सक्षमीकरणाबरोबरच पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देण्यात आला आहे. यामध्ये मद्य वगळता कोणत्याही वस्तूच्या किमतीत वाढ होणार नाही.
महिलांना मुद्रांक नोंदणीत सवलत दिल्याने होणारे अर्थिक नुकसान दारुच्या किमती वाढवून त्यातून भरुन काढण्यात येणार आहे. देशी मद्यावर निर्मिती मूल्य 213 टक्क्यांवरुन 220 टक्के प्रस्तावित करण्यात आले आहे. तसेच व्हॅट 60 टक्क्यावरुन 65 टक्क्यांवर करण्यात आला आहे.
दरम्यान, सगळी सोंगे आणता येतात पण पैशाचे सोंग आणता येत नाही, याचे भान ठेवत अजित पावारांनी राज्यातील सर्व विभागांचा, विविध क्षेत्र आणि घटकांचा साकल्याने विचार करुन एक सर्वसमावेशक आणि समतोल म्हणावा असा अर्थसंकल्प सादर केला, असं शिवसेनेच्या सामना अग्रलेखात म्हटलं आहे.
तसेच लॉकडाऊनमुळे बंद पडलेल्या बाजारपेठा, व्यापार-उद्योग एकूण अर्थव्यवस्थेचा झालेला कोंडमारा. चारही बाजूने संकटांचे आव्हान असताना अर्थव्यवस्थेचा डोलारा सांभाळणे, हे तसं जिकिरीचेच काम होते. मात्र तरीदेखील अर्थमंत्र्यांनी महाविकास आघाडीला चालना देणार दुसरा अर्थसंकल्प मांडला, त्याबद्दल ते नक्कीच प्रशंसेस पात्र असल्याचंही अग्रलेखात म्हटलं.
Considering the huge impact of Covid pandemic on the State Budget, it’s remarkable to note that the Budget presented today prioritizes all developmental aspects that shall be beneficial to the common man.
— Parth Pawar (@parthajitpawar) March 8, 2021
महत्वाच्या बातम्या-
जसप्रीत बुमराह लवकरच अडकणार लग्नबंधनात; ‘या’ ठिकाणी करणार लग्न
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरला कोरोनाची लागण?; रणधीर कपूर यांनी केला खुलासा, म्हणाले…
हजाराच्या खरेदीवर एक लिटर पेट्रोल फ्री! ‘या’ व्यापाऱ्याची ऑफर
‘सगळी सोंग आणता येतात, पण…’; अजित पवारांच शिवसेनेच्या सामनातून तोंडभरुन कौतुक
आज सोनं ‘इतक्या’ रुपयांनी महागलं, पाहा काय आहेत भाव