रशिया-यूक्रेन युद्धाचा मोठा फटका; सिलेंडर ‘इतक्या’ रूपयांनी महागला

मुंबई | देशातील वाढती महागाई ही देशासमोरची सर्वात मोठी समस्या बनली आहे. सामान्य नागरिकांना वाढत्या महागाईचा सर्वात जास्त फटका बसत आहे. त्यातच आता सामान्य माणसांच्या खिश्याला मोठा फटका बसल्याचं पहायला मिळत आहे.

जागतिक स्तरावर रशिया-यूक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे पेट्रोलियम पदार्थांचे दर वाढले आहेत. त्यामुळे 1 मार्च रोजी एलपीजी सिलेंडरचे नवे दर जारी करण्यात आले आहेत.

सिलेंडरच्या दरात 105 रुपयांनी वाढ झाली आहे. ही वाढ व्यावसायिक गॅस सिलेंडरसाठी (Commercial LPG Cylinder) करण्यात आली आहे. तर 5 राज्यांच्या निवडणुका सुरू असल्यानं घरगुती सिलेंडरच्या दरात 7 मार्चनंतर वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशात विधानसभेच्या सहाव्या टप्प्यातील मतदान 3 मार्च आणि अखेरच्या टप्प्यातील मतदान 7 मार्च रोजी होणार आहे. त्यामुळे 7 मार्चनंतर घरगुती गॅस सिलेंडरसाठी तुमच्या खिशातून अधिकचा खर्च सहन करावा लागू शकतो.

या दरवाढीनंतर मंगळवारपासून 19 किलो व्यावसायिक सिलेंडरची किंमत 2,012 रुपये इतकी होणार आहे. तर 5 किलो सिलेंडरची किंमत 27 रुपयांनी वाढणार आहे. आता दिल्लीत 5 किलो सिलेंडरसाठी 569 रुपये मोजावे लागतील.

मुंबईत 19 किलोसाठी 1 हजार 963 रुपये द्यावे लागतील. कच्च्या तेलाचे दर 102 डॉलर प्रति बॅरेल झाल्यानंतरही ऑक्टोबर 2021 पासून घरगुती सिलेंडरच्या दरात फारसा बदल झालेला नाही.

निवडणुकीनंतर म्हणजे 7 मार्च मतदानाचा अखेरचा टप्पा झाल्यानंतर कधीही घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 100 ते 200 रुपये प्रति सिलेंडर वाढ होण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जात आहे.

महत्वाच्या बातम्या- 

‘…तर शुगर राहिल कंट्रोलमध्ये’; डायबिटीस पेशंटसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी 

“डॉक्टर हे नालायक, हरामखोर मारखाण्याच्या लायकीचे, त्यांच्याकडे कधी जाऊ नका” 

प्रियंका गांधींचा हटके प्रचार! बाॅडीगार्डसह नेते, कार्यकर्ते रस्त्यावर धावले; पाहा व्हिडीओ 

रशियाचं टेन्शन वाढलं! युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी केली ‘त्या’ महत्त्वाच्या कागदावर सही

“राज्यपालांनी माफी मागावी, अन्यथा वयाचा विचार न करता धोतर फेडू”