चारचौघांमध्ये राडा!, महाविकास आघाडीतील नेत्यांच्या भांडणाचा दुसरा व्हिडीओ व्हायरल

जुन्नर | जुन्नर तालुक्यातील उंब्रज नंबर 2 गावात रस्त्याच्या भुमीपूजन कार्यक्रमात आजी-माजी आमदार एकमेकांवर भिडल्याचा धक्कादायक प्रकार घडला. माजी आमदार शरद सोनवणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अतुल बेनके यांच्यामध्ये भर कार्यक्रमांत शाब्दिक चकमक उडाली.

मुख्यमंत्री ग्रामीण सडक योजना आहे. मी सगळ्या ग्रामीणची लिस्ट चेक केली. कोणचंही कामं चेंज केली नाही. आपलं काही भांडण आहे का?, माझ्याकडे पुरावे आहेत. शासनाचं निर्णय असल्यानं कामं थांबलं नाही, असं उत्तर सोनवणे यांनी बेनके यांच्या आरोपावर दिलं.

फक्त कोरोनाच्या काळात काम थांबलं होतं. हे आम्हालाही माहिती आहे. सर्वांनी बरोबरीने चाललं पाहिजे. सर्वांनी त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असंही सोनवणे म्हणाले.

तुमची माझी बैठक लावा. सगळ्या गोष्टी मला माहिती आहे. दिलीप मोहिते पाटील यांच्याशी मी बोललो. देवेंद्र फडणवीस स्वत: वकील आहेत.  मला त्यांच्या कामाची पद्धत माहिती आहे. कामं राहता कामा नये म्हणून त्यांनी सगळे पर्याय वापरले होते, असं सोनवणे म्हणाले.

चर्चा करून कामं होईल. आम्ही चर्चा करायला तयार आहे ना. लोकांना काय वाटतं सोनवणेंनी शब्द पाळला आणि नवीन आमदारांनी तो पुर्ण केला. हे होयला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे, असंही सोनवणे यांनी म्हटलं आहे.

आजचा प्रसंग घडलेला आहे. तो तुमच्या गैरसमजीमुळे घडलेला आहे. तुम्ही म्हणता. पोस्टरवर हे करा ते करा असं चालत नाही जुन्नरमध्ये, असं अतुल बेनके म्हणाले.

जुन्नरचं आम्हाला नका सांगू. मी पण इथला आमदार होतो. मी काय इथं गोट्या खेळत होतो का?, असं प्रत्युत्तर अतुल बेनके यांनी दिलं आहे. आपलं कर्तुत्व किती आपण बोलतो किती, असं टोला देखील अतुल बेनके यांना लगावला आहे.

दरम्यान, दोन्ही नेत्यांच्या स्पष्टीकरणानंतर हा वाद पदाधिकाऱ्यांनी मि़टवला आणि उर्वरित कार्यक्रम पार पडला. मात्र, या दोन्ही नेत्यांच्या भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ-


महत्त्वाच्या बातम्या – 

आत्ताची सर्वात मोठी बातमी! ‘या’ तारखेपर्यंत राज्यातील सर्व महाविद्यालये बंद

हात लावायचा नाय मला! महाविकास आघाडीतील आजी-माजी आमदार भिडले!

आरोग्यमंत्र्यानी बुस्टर डोसविषयी दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती, म्हणाले…

 ‘मला मारलं बिरलं तर लफडं होईल म्हणून…’; आव्हाड आक्रमक

  लसीचा दुसरा डोस घ्या नाहीतर क्वारंटाईन व्हा, राष्ट्रवादीच्या आमदाराचा मोठा निर्णय