लग्न मंडपात मेहुणीने असं काही केलं की सगळे पाहतच राहिले, पाहा व्हायरल व्हिडीओ

नवी दिल्ली | सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ खूपच धक्कादायक आणि भितीदायक असतात. तर त्यातील काही व्हिडीओ खूपच मजेशीर असतात.

यामध्ये काही व्हिडीओ लग्नातीलही असतात. आपल्याला माहित आहे की, लग्न म्हटलं की नाच गाण. त्याचप्रमाणे नटणं मुरणं हे आलंच. लग्नामध्ये या सगळ्या गोष्टींशिवाय लग्नाला खऱ्या अर्थाने मजाच येत नाही.

ज्याप्रमाणे बायकाचा आपल्या नवरऱ्यावर जेवढा हक्क असतो. तेवढाच हक्क नवरीच्या बहिणाचा म्हणजेच मेहुणीचा आपल्या बहिणीच्या नवऱ्यावर असतो, असं म्हणतात. याच संदर्भातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये एक मेहुणी कोणताच मागचा पुढचा विचार न करता एक शक्कल लढवत आपल्या बहिणीच्या नवऱ्याचे म्हणजेच दाजींचे बूट पळवत असल्याचं पाहायला मिळतं आहे. हा व्हिडीओ एका लग्नातील संमारंभातील असून, त्या ठिकाणी बूट पळवण्याचा कार्यक्रम सुरू आहे.

सुरूवातीला नवरीची एक कलवरी म्हणजेच त्या नवरदेवाची महुणी बुट मागत आहे. पंरतू नवरदेव तिला आपल्या पायातील बूट देत नसल्याचं दिसून येतं आहे. परंतू ती तरूणी म्हणजेच कलवरी आपले प्रयत्न तसेच सुरू ठेवताना दिसतं आहे. मात्र तरीही काही केल्या नवरदेव आपले बूट काही तिला देत नाहीय.

तरूणीच्या हे लक्षात आल्यावर तिने नवरा आणि नवरी ज्या ठिकाणी बसलेले असतात. त्या ठिकाणी नवरदेवाचा मोबाईल आणि वॉलेट असतं ते ती घेते आणि आपल्या कुटुंबातील एका सदस्याकडे देते.

हे पाहून नवरदेवाला काय कारवं हे सूचत नाही, शेवटी तो आपले दोन्ही पायातले बूट काढून आपल्या मेहुणीला देतो. बूट दिल्यानंतर ती तरूणी खूप खूश होते आणि आता बूट मिळणार नसल्याचंही नवरदेवाला ती सांगत असल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळतं आहे.

हा व्हिडीओ एका यूजरने आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवरून शेअर केला असून, आतापर्यंत जवळजवळ हजारो इतक्या लोकांनी पाहिला आहे. त्याचप्रमाणे बऱ्याच नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कमेंट्स देखील केल्या असल्याचं पाहायला मिळतं आहे.

https://www.instagram.com/p/CHcPadLJh0v/?utm_source=ig_embed&ig_rid=edd9103a-3aa3-4825-a102-2393a5fbcec8

महत्वाच्या बातम्या-

काय सांगता! तरूणाने चक्क एका बोटानेच कापलं भलमोठं कलिंगड, पाहा व्हिडीओ

चक्क माकडाने काढली एका मुलीवर खुन्नस, पाहा मजेशीर व्हिडीओ

भर मंडपातच नवरदेवानं नखरे दाखवायला केली सुरूवात, पाहा व्हिडीओ

चालता-चालता गेला सिंहाचा तोल अन्…, पाहा काळजाचं पाणी करणारा व्हिडीओ

नवरीऐवजी नवरदेवच करतोय मेकअप, पाहा व्हायरल व्हिडीओ