धक्कादायक! स्मरणशक्ती वाढवण्यासाठी शिक्षकानं विद्यार्थ्यांना दिलं ‘हे’ इंजेक्शन

जीवनात ज्ञानाचा साक्षात्कार करण्यात गुरुचे महत्व अधिक आहे. शाळा, महाविद्यालयांतील शिक्षक, आध्यात्मिक गुरु , कला-विद्या यात मार्गदर्शन करणारे शिक्षक यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. गुरु-शिष्याच्या नात्याला पवित्र मानलं जाते. मात्र या विश्वासालाच तडा देणारं काम एका मुलांची शिकवणी घेणाऱ्या व्यक्तीनं केलं आहे.

संदीप नावाचा बीए द्वितीय वर्षाचा विद्यार्थी दिल्लीमध्ये मोफत क्लास घ्यायचा. त्यानं शिकवणीसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना नॉर्मल सलाईन सोल्युशन्स इंजेक्शनच्या माध्यमातून दिली. या सगळ्या प्रकारातून संदीप या आरोप्याला पोलिसांनी अटक केलं.

एका विद्यार्थ्यानं घरी हे इंजेक्शन घेतलं तेव्हा त्याच्या घरच्यांनी त्याला इंजेक्शन घेताना पाहिलं. तेव्हा हा सगळा प्रकार उघडकीस आला. असं पोलिसांनी चौकशीत सांगितलं.

चौकशीत संदीप म्हणाला की, मुलांची स्मरणशक्ती एनएस सोल्युशन्स दिल्यानं वाढते हे मी युट्युबवर पाहिलं होतं. दिल्लीतील मांडवली इथे हा प्रकार घडला आहे. या सर्व प्रकाराविषयी एफ.आयआर दाखल करण्यात आली आहे. असं दिल्लीचे डीसीपी संदीप यादव यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या –

नरेंद्र मोदी का करतात उठसूट फोटोशूट? जाणून घ्या यामागील कारण

    ‘व्हॅलेंटाईन डे’चं अनोखं गिफ्ट; आजारी पत्नीला नवऱ्यानं दिली किडनी

      जेनेलियाने शेअर केला बेडरूम मधील ‘तो’ व्हिडीओ, चाहते घायाळ

        …..म्हणून बाथरुममध्ये हृदयविका.राच्या झट.क्यांची प्रकरणं येत आहेत समोर, जाणून घ्या

          टिकटाॅक युजर्ससाठी आनंदाची बातमी, भारतात टिकटाॅकच पुन्हा कमबॅक?