“तीन नापास विद्यार्थी डिस्टिंक्शनमध्ये आल्यासारखं वागतायेत”

मुंबई | मुंबई बँक (Mumbai Bank) बोगस मजूर प्रकरणात दरेकरांविरोधात गुन्हा दाखल झालाय. या कारवाईला सुरूवात झाल्यापासून महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) ही कारवाई सूडबुद्धीने करत आहे, असा आरोप भाजपकडून करण्यात आलाय.

दरेकरांनी आज पुन्हा तोच आरोप केलाय. माझ्या वरच संकट हे महाविकास आघाडी निर्मित संकट आहे. आणि तसेही मी त्याला संकट मानत नाही. न्याय व्यवस्था सत्याच्या बाजूने उभी असते, असं ते म्हणाले.

सोमवारी सुनावणीनंतर सत्य समोर येईल. माझ्यावर कसलंही दडपण नाही, मी घाबरणाऱ्यातला नाही, असंही प्रविण दरेकर म्हणाले आहेत.

प्रविण दरेकरांनी महाविकास आघाडीला नापास विद्यार्थी म्हणत पुन्हा डिवचलं आहे. तीन नापास विद्यार्थी डिस्टिंक्शनमध्ये आल्यासारखे वागत आहेत, असा टोला त्यांनी लगावला आहे.

शरद पवार यांच्या वक्तव्याचाही त्यांनी समाचार घेतला आहे. शरद पवार पक्ष वाढवण्याचं काम करू शकतात. मात्र आगामी निवडणुकीत भाजपचीच सत्ता येईल, असं ते म्हणाले.

गेल्या निवडणुकीतही देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली सेना-भाजपचं सरकार आलं होतं, पण स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी हे तिन्ही वेग वेगळ्या विचारांचे पक्ष सोबत आले, अशी टीका त्यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

“देश सध्या चारच लोक चालवत आहेत, दोघं विकतात तर 2 जण खरेदी करतात”

भाजपला पराभूत करण्यासाठी एमआयएमचा मोठा डाव, आता… 

“पावसात भिजून देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे फक्त 54 आमदार निवडून आले” 

कोरोनाने पुन्हा टेंशन वाढवलं; गेल्या 24 तासातील रूग्णांची आकडेवारी समोर 

मोदी सरकारचा सर्व राज्यांना अलर्ट, म्हणाले…