“देश सध्या चारच लोक चालवत आहेत, दोघं विकतात तर 2 जण खरेदी करतात”

मुंबई | देशाला सध्या 4 लोक चालवत आहेत, त्यापैकी दोन खरेदी करतात, तर दोघं जण विकत आहेत, असं म्हणत प्रसिद्ध लेखिका अरुंधती राय यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे.

पंजाब युनिव्हर्सिटीच्या सनी ओबेरॉय ऑडिटोरियममध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलताना राय त्यांनी देशातील प्रमुख मीडियासह काही संस्थांचा दुरुपयोग करण्यात येत असल्याचंही म्हटलं आहे.

सध्या देशात जातीय तेढ निर्माण करण्यात येत आहे. जात, धर्म, पंथ, भाषा आणि प्रदेश यांपासून पुढे विचार करत आपण एकता जपली पाहिजे, असं म्हणत धार्मिक संस्था आणि संघटनांनाही त्यांनी लक्ष्य केलं आहे.

अरुंधती राय यांनी नाव न घेता नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यासह देशातील दोन नामवंत उद्योजकांना लक्ष्य केलं.

उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्याकडेच त्यांच्या म्हणण्याच्या रोख होता असं दिसतंय.

शेतकरी आंदोलनाचं कौतूक करत, या आंदोलनाने जगाला दाखवून दिलं की आपल्या न्याय हक्कासाठी आपण कशारितीने सरकारच्या डोळ्यात डोळे घालून संवाद करू शकतो, असंही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या- 

भाजपला पराभूत करण्यासाठी एमआयएमचा मोठा डाव, आता… 

“पावसात भिजून देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे फक्त 54 आमदार निवडून आले” 

कोरोनाने पुन्हा टेंशन वाढवलं; गेल्या 24 तासातील रूग्णांची आकडेवारी समोर 

मोदी सरकारचा सर्व राज्यांना अलर्ट, म्हणाले… 

‘कॉपी करताना सापडल्यास…’; वर्षा गायकवाड यांचा मोठा निर्णय