मुंबई | महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेना आणि भाजप यांच्यातील वाद चांगलाच गाजला. भाजपने वारंवार सरकार पडणार असल्याचं भाकित केलं आणि दरवेळी वेगवेगळ्या तारखा दिल्या.
काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच मार्चमध्ये सरकार पडणार असल्याचं सांगितलं होतं. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी एप्रिलमध्ये चिंता दूर होणार असल्याचं म्हटलं होतं.
अशातच आता भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मोठा दावा केला आहे. नारायण राणे सध्या वाशिम दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत आणि महाविकास आघाडी सरकारवर टीका केली.
संजय राऊतांची बोलण्याची लायकी नाही. संजय राऊतांना मी पत्रकार समजत नाही. भाजपच्या पोलखोल रथाची तोडफोड केली, असा आरोप राणेंनी केला. तर असली बालिश कामं शिवसेनाच करू शकते, असं टीका देखील नारायण राणेंनी केली आहे.
फक्त तीन मिनीटात कॅबिनेटची मिटिंग संपवणारे मुख्यमंत्री कुठं असतात का?, असा सवाल नारायण राणे यांनी केला आहे. जर शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती झाली तर वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही, असंही नारायण राणे म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
“राज ठाकरे दादागिरी करत असतील तर आम्ही आमच्या पद्धतीनं उत्तर देऊ”
चेहऱ्यावर स्मित हास्य अन् डोळ्यात पाणी; हवाई सुंदरीचा भावनिक व्हिडीओ व्हायरल
“दादागिरी केली असती तर 35 वर्षे राजकारणात टिकलो नसतो”
स्टार फुटबॉलर ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नवजात मुलाचं निधन!
मोठी बातमी! गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत वाढ