सामनामध्ये ‘या’ विषयाचा अग्रलेख लिहून दाखवावा; औवेसींचं उद्धव ठाकरेंना आवाहन

मुंबई : एमआयएम पक्षाचे अध्यक्ष खासदार असुद्दीन औवेसी यांनी शिवसेनेच्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना डिवचलं आहे. औवेसींनी ठाकरेंना आपल्या सामना या दैनिकात समान नागरी कायदा म्हणजे काय? यावर अग्रलेख लिहून दाखवा, अस आव्हान त्यांनी केलं आहे.

वंचित आघाडीतून बाहेर पडल्यावर एमआयएम स्वबळावर निवडणुक लढणार आहे. विधानसभेच्या तोंडावर असुद्दीन औवेसी यांनी महाराष्ट्रभरात सभांचा सपाटा लावला आहे. बुधवारी नांदेड सभेत ते बोलत होते.

उद्धव ठाकरेंचं काल भाषण एकल, ते अमित शहा यांना समान नागरी कायदा लागू करा, असं सांगत आहेत. त्यांची मागणी ठिक आहे. आता उद्धव ठाकरेंनी समान कायदा  म्हणजे काय? यावर आपल्या सामना  दैनिकात अग्रलेख लिहून दाखवावा. तुम्हाला जे माहित असेल ते लिहा, असं औवेसी यांनी म्हटलं आहे.

एमआयएम वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडलेली असली तरी प्रकाश आंबडेकरांनी युतीचे सर्व मार्ग खुले असल्याचं वारंवार सांगितलं आहे. 

दरम्यान, विधानसभेच्या रणधुमाळीत येणाऱ्या काळात वंचित एमआयएम सोबत येणार की स्वतंत्र लढणार हे पाहावे लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या-