IPLचं बिगुल वाजलं! 15 व्या मोसमाचं वेळापत्रक जाहीर, आता 5-5 चे दोन गट पडले

मुंबई | आयपीएल 2022 (IPL 2022) साठीचा मेगा लिलाव आता नुकताच पार पडला आहे. त्यानंतर आता आयपीएलच्या बहुप्रतिक्षित 15 व्या मोसमाचं वेळापत्रक आता जाहीर करण्यात आलंय.

आयपीएल मोसमाची सुरुवात 26 मार्चपासून होणार असून 29 मे ला अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. हे वेळापत्रक आय़पीएलच्या ऑफिशिअल हॅडलवरून ट्विट करण्यात आलं आहे.

यंदाच्या सीझनमध्ये काही मोठे बदल करण्यात आले आहेत. यंदा एकूण 70 साखळी सामने खेळवण्यात येणार आहेत. या सामन्यांच आयोजन  मुंबई, नवी मुंबई आणि पुण्यात करण्यात आलंय.

यावर्षी गुजरात आणि लखनऊ हे दोन संघ सामिल केल्याने आता संघाची संख्या 10 वर पोहोचली आहे. त्यामुळे आता आयपीएलच्या फाॅर्मटमध्ये बदल करण्यात आलाय.

यंदा दोन गट तयार करण्यात आला आहे. मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिट्ल्स, लखनऊ सुपर जायंट्स असा पहिला गट असेल.

तर चेन्नई सुपर किंग्स, सनरायजर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, पंजाब किंग्स, गुजरात टायटन्स असा दुसरा गट असणार आहे. त्यामुळे यंदा आयपीएलची चुरस आणखीनच वाढणार असल्याचं चित्र आहे.

दरम्यान, यावेळी टाटा समुहाकडे आयपीएलची मालकी असल्याने टाटा आयपीएल असं नामबोधन करण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

महेश मांजरेकरांना जोर का झटका; अटकेची टांगती तलवार कायम!

रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय, आता…

Russia-Ukraine War: “मी देश सोडला नाही, आता आम्ही एकटे पडलोय…”

BIG BREAKING: नवाब मलिक यांची तब्येत बिघडली, मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात दाखल

लेकीला छातीशी कवटाळून धायमोकलून रडला; युक्रेनमधील बाप-लेकीचा व्हिडीओ व्हायरल