युक्रेन-रशिया युद्धाविषयी सर्वात मोठी बातमी आली समोर

नवी दिल्ली | गेल्या 15 दिवसांपासून सुरू असलेलं रशिया-युक्रेन युद्ध अनेक चर्चांच्या फेऱ्यानंतरही सुरूच आहे. रशियन सैन्य दिवसेंदिवस युक्रेनला उद्ध्वस्त करत आहे.

युक्रेनमधील काही शहरांवर आता रशियन सैनिकांनी ताबा मिळवला आहे. पण रशियन सैन्याला अद्यापी युक्रेनची राजधानी कीव शहरावर ताबा मिळवता आला नाही.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी रशियन सैन्याला कसल्याही परिस्थितीत कीव शहरावर ताबा मिळवण्याचे आदेश दिले आहेत.

कीव शहरावर आता रशिया तिन्ही दलांच्या माध्यमातून हल्ला करण्याची तयारी करत आहे. रशियन सैन्य कीवच्या दोन्ही बाजूंना लाखोंच्या संख्येनं धडकलं आहे.

राजधानी कीववर टॅंकविरोधी मिसाईलचे हल्ले आता तिव्र झाले आहेत. युक्रेनच्या सैन्यानं आपल्या नागरिकांना घेऊन आतापर्यंत रशियाचा मुकाबला केला आहे.

जागतिक महासत्ताक असणारे देश देखील आमच्या मदतीला येत नसल्याची खंत युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी बोलून दाखवली होती. परिणामी युक्रेन आता मध्यस्थीच्या मार्गानं जाण्याचा विचार करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

नाटो देशांच्या समुहात सामिल होण्यावरून इतकं मोठं युद्ध सुरू झालं आहे. कीव शहर रशियाच्या दुतर्फा हल्ल्यांनी हादरलं आहे.

दरम्यान, रशियावर अनेक देशांनी विविध निर्बंध लादले आहेत. असं असलं तरी रशियान सैन्य युक्रेनवर हल्ला करत राहाणार असं पुतिन म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

 “फडणवीस असे 10-20 शरद पवार खिशात घालून फिरतात”

  “मुंबई पालिकेवर शिवसेनेचाच झेंडा कायम राहणार”

  गोव्यातील विजयामुळे देवेंद्र फडणवीसांचं मुंबईत जंगी स्वागत

  निवडणुकांनंतर Petrol-Diesel दरात काय बदल झाला, वाचा एका क्लिकवर

  मोठी बातमी! ….म्हणून मुंबईत ‘इतक्या’ दिवस पाणीपुरवठा बंद राहणार