युक्रेनी सैन्याची भारतीयांना मारहाण?, राहुल गांधींनी शेअर केलेल्या व्हिडीओमुळे चिंता वाढली

नवी दिल्ली | रशिया-युक्रेन युद्धामुळं सर्वांनाच मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवर सर्वशक्तिनीशी हल्ला करण्याचे आदेश सैन्याला दिले आहेत.

पुतिन यांच्या आदेशानंतर रशियन सैन्य झपाट्याने युक्रेनवर ताबा मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. युक्रेनची राजधानी कीव शहरात मोठ्या प्रमाणात रशियन सैन्य दाखल झालं आहे. परिणामी आता घनघोर युद्ध पेटलं आहे.

युक्रेन-रशिया युद्धाचा फटका भारताला मोठ्या प्रमाणात बसत आहे. युक्रेनमध्ये भारतातील तब्बल 15 हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षणासाठी गेलेले आहेत. त्या विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

युक्रेनमधून बाहेर पडण्यासाठी विद्यार्थी मिळेल त्या मार्गानं निघाले आहेत. प्रचंड हाल अपेष्टा सहन करत सर्व विद्यार्थी निघाले आहेत. पोलंड सीमेवर भारतीय विद्यार्थ्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागला आहे.

काॅंग्रेस नेते राहुल गांधींनी भारतीय विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा व्हिडीओ ट्विट करत सरकारला जाब विचारला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सरकारनं आवश्यक ती सर्व पावले उचलावी असं गांधी म्हणाले आहेत.

पोलंड देशाच्या सीमेवर तैनात युक्रेन देशाच्या सैनिकांनी भारतीय विद्यार्थ्यांना मारहाण केली आहे. या मारहाणीत काही विद्यार्थ्यांना गंभीर दुखापत  झाली आहे. विद्यार्थ्यांना घाबरवण्यासाठी गोळीबार केल्याची माहिती मिळत आहे.

भारत सरकार युक्रेनला मदत करत नाही मग आम्ही तरी का तुम्हाला मदत करावी, असं देखील युक्रेनच्या सैनिकांनी म्हटल्याचं विद्यार्थी म्हणत आहेत. परिणामी केंद्र सरकारनं आपल्या हालचाली वाढवल्या आहेत.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रीय मंत्र्यांसोबत उच्चस्तरिय बैठक घेतली आहे. सरकार विद्यार्थ्यांना आणण्याचा पुरेपुर प्रयत्न करत आहे.

पाहा व्हिडीओ – 

महत्त्वाच्या बातम्या – 

 रशिया-युक्रेन युद्धावर तोडगा निघणार का?, बेलारूसच्या बैठकीवर जगाचं लक्ष लागलं

 “नवाब मलिक चांगला माणूस, त्यांना अटक व्हायला नको होती”

 रशियामुळे पाकिस्तानची गोची; जो बायडन यांच्या इशाऱ्याने इम्रान खान यांचं टेन्शन वाढलं

“…तर धैर्यवर्धन पुंडकरांच्या घरासमोर हात कलम करेन”

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; मोदी सरकार लवकरच ‘हा’ निर्णय घेणार