ठाकरे सरकारचा तिसरा मंत्री अडचणीत; ‘या’ बड्या नेत्यावर ईडीची कारवाई

मुंबई | राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीने अटकेची कारवाई केली आहे. मलिकांना चौकशीसाठी बोलवण्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती.

मलिकांना अटक केल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापल्याचं पहायला मिळतंय. भाजप आणि महाविकास आघाडीचे नेते आमने सामने आले आहेत.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी थेट पत्रकार परिषद घेत केंद्रावर आणि भाजपवर घणाघाती आरोप केले आहेत. अशातच आता ठाकरे सरकारची आणखी एक विकेट पडणार असल्याचं चित्र समोर येत आहे.

राज्याचे उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. प्राजक्त तनपुरे यांच्या राम गणेश गडकरी साखर कारखान्याची मालमत्ता ईडीने जप्त केल्याची माहिती समोर आली आहे.

कारखाना उभा असलेल्या नागपूरमधली 90 एकर जमिनीवर ही कारवाई करण्यात आली आहे. काँग्रेस नेते आशिष देशमुख यांच्या तक्षशिला सिक्युरिटीजची ही जमीन होती.

ईडीने कारवाई केलेल्या जमिनीची किंमत जवळपास 7 कोटी 60 कोटी आहे. तर जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेची किंमत 13 कोटी 41 लाख असल्याची माहिती कळतीये.

दरम्यान, ईडीच्या या कारवाईनंतर आता राज्यातील वातावरण आणखी पेटण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीला हा झटका असल्याचं देखील दिसतंय.

महत्त्वाच्या बातम्या – 

सावधान! कोरोना अजून संपला नाही, लवकरच चौथी लाट येणार; तज्ज्ञांचा दावा

“मी शरद पवारांचं राजकारण नासवलंय, पवारांचा सच्चा सैनिक म्हणविणारे…”

 “राज्यपाल महोदय, छत्रपतींचा अपमान खपवून घेणार नाही, तुमच्या ‘चहा’ छाप सैनिकांनी…”

“…त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे, मुख्यमंत्री अजून किती दिवस हे सहन करायचं” 

“…तर धैर्यवर्धन पुंडकरांच्या घरासमोर हात कलम करेन”