युद्ध युक्रेन जिंकणार?, अमेरिका ‘हे’ मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत

मुंबई | अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन यांनी रविवारी सांगितलं की युक्रेनियन लोकांना युद्धभूमीवर यशस्वी होण्यासाठी आणि वाटाघाटीच्या टेबलावर त्यांना मजबूत स्थितीत आणण्यासाठी अमेरिका आक्रमक पावले उचलत आहे.

सीएनएनशी बोलताना जेक सुलिव्हन म्हणाले की, रशियाने शेजारी देशावर हल्ला केल्यानंतर मॉस्कोविरुद्ध युक्रेनला पाठिंबा देण्यात अमेरिका महत्त्वाची भूमिका बजावेल.

युक्रेनियन लोकांना रणांगणावर यशस्वी होण्यासाठी आणि त्यांना वाटाघाटीच्या टेबलावर मजबूत स्थितीत ठेवण्यासाठी आम्ही मोठी पावले उचलत आहोत, असं सुलिव्हन म्हणालेत.

आम्ही असेच करत राहू. आम्ही याबाबतीत पुढाकार घेत राहू आणि यापूर्वी आम्ही आजवर ज्या प्रकारे भूमिका बजावली आहे, तशीच महत्त्वाची भूमिका अमेरिका बजावेल, असंही त्यांनी सांगितलं.

व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवर केलेल्या लष्करी कारवाईमुळे संतापलेल्या अमेरिका आणि पाश्चात्य देशांनी अनेक कठोर निर्बंध लादले आहेत.

दरम्यान, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी चीन आणि भारत या रशियाशी व्यापारी संबंध असलेल्या देशांनाही इशारा दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

महाराष्ट्राला हादरवलेल्या चंद्रपूरपमधील ‘त्या’ मुलीच्या हत्येमागचं धक्कादायक सत्य समोर! 

“भाजपचे नेते पिसाळलेला कुत्रा चावल्यागत वागतायेत” 

सरकारी कर्मचाऱ्यांना धक्का; महत्त्वाची माहिती समोर 

“हलकट राजकारण कधी अनुभवलं नाही, पवार साहेबांच्या घरावरील हल्ल्यानंतर…” 

बॅटिंग करता करता आश्विनने सोडलं मैदान; IPL इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं…