संपूर्ण रेल्वे तिच्यावरुन धडधडत गेली अन् मग…; पाहा काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ!

चंढीगढ | एखादी ट्रेन भरधाव वेगाने जरी आपल्या समोरुन गेली तरी आपल्या काळजाचा ठोका चुकतो. काहीवेळा तर ट्रेनचा वेग पाहून आपले डोळे गरगर फिरतात. अशीच एखादी ट्रेन जर आपल्या अंगावरून गेली तर मग काय होईल, याचा तर विचार देखील करवत नाही.

मात्र, हरियाणा मधील एका महिलेने याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे. संपूर्ण ट्रेन या महिलेच्या अंगावरुन धडधडत गेली परंतु या महिलेला जरासंही खरचटलं नाही. हरियाणाच्या रोहतक मधील हा व्हिडिओ आहे. सध्या सोशल मिडीयावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

एएनआयने हा व्हिडीओ ट्वीट केला आहे. जेव्हा या महिलेच्या अंगावरुन भरधाव वेगाने ट्रेन  जाते तेव्हा ती आपला जीव कसा वाचवते, हे आपल्याला या व्हिडीओमध्ये पहायला मिळेल.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये दिसेल की, एक महिला रेल्वे ट्रॅकवर झोपली आहे. तिच्या अंगावरुन एक मालगाडी जात आहे. रेल्वे ट्रॅकच्या दोन्ही बाजूला भरपूर लोक आहेत. ते लोक त्या महिलेला ओरडून ओरडून अजिबात न हालण्याचा सल्ला देत आहेत. ती महिला देखील निपचीत पडून राहिली आहे.

संपूर्ण ट्रेन तिच्या अंगावरून पास होईपर्यंत ती महिला कसलीच हालचाल करत नाही. तसेच व्हिडीओमध्ये दिसेल की, ट्रेन ट्रॅकवरुन पास झाली की काही माणसे त्या महिलेजवळ जातात. महिला ट्रेन ट्रॅकवरुन उठून बाजूला जाते आणि मग चालू लागते.

माहितीनुसार, ही ट्रेन सिग्नलला उभी होती. तेव्हा महिला ट्रॅक ओलांडत होती. मात्र, अचानक ट्रेन सुरु होते.  अचानक ट्रेन सुरु झाल्याने ती महिला आपला जीव वाचवण्यासाठी ट्रॅकवरच झोपते. सुदैवाने या महिलेने योग्य निर्णय घेतल्याने मोठा अपघात टळला.

महत्वाच्या बातम्या –

निषेधार्थ मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पाठवली 150 कंडोमची पाकिटं; वाचा काय आहे प्रकार

पूजाच्या वडिलांचा नवा गौप्य.स्फोट, भाजपचं घेतलं नाव!

देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच! ‘या’ महिला आरोपीला दिली जाणार फाशी

IPLच्या इतिहासातील सर्वात मोठी बोली!!! दक्षिण आफ्रिकेच्या ‘या’ खेळाडूवर लागली जबरदस्त बोली

IPL 2021 Auction | पंजाबच्या संघाचं नाव बदललं? के.एल.राहूलचा खुलासा म्हणाला…..