मगर पकडण्यासाठी तरूणाने लढवली अनोखी शक्कल, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ खूपच मजेशीर आणि हस्यास्पद असतात. तर काही व्हिडीओ खूपच धक्कादायक आणि अंगावर काटा येईल असे असतात.

याच संदर्भातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक मगर रहदारीच्या परिसरात शिरली असल्याचं पाहायला मिळतं आहे.

मगरीला पाहून त्या परिसरातील लोकांची पळता भुई झाली असून, त्यांना काय करावं आणि काय नाही हे कळत नाहीय. मात्र यामधून एक व्यक्ती त्या मगरीला पकडण्याचं धाडस करत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसून येत आहे.

तो एकटा तरूण त्या मगरीला पकडण्यासाठी त्यानं एक मोठ डस्टबिन घेतलं आहे. ते घेऊन त्यानं त्या डस्टबिनला जमिनीवर आडवं पाडलं असून, त्याच तोंड त्या मगरीच्या बाजूला केलं आहे. जेणेकरून ती मगर त्यामध्ये शिरलं आणि तिला पकडता येईल.

हे करण्यासाठी तो ते डस्टबिन हळू-हळू त्या मगरीच्या समोर ढकलत आहे. परंतू मगर त्या तरूणाच्या अंगावर चांगलीच चवताळून जातं असल्याचंही पाहायला मिळतं आहे. तरीही तो तरूण त्या तिला पकडण्याचे प्रयत्न सुरूच ठेवतो.

काहीवेळानंतर त्या मगरीच तोंड त्या डस्टबिनमध्ये जात, हे पाहून लगेचंच तो तरूण वरतून झाकण टाकतो आणि त्या मगरीला पकडतो. मगरीला पकडल्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या लोकांनी त्या तरूणाचं खूप कौतुक केलं असल्याचंही व्हिडीओमध्ये दिसून येतं आहे.

महत्वाच्या बातम्या-

घसरगुंडी खेळता-खेळता गेला तोल अन्…, पाहा चिमुकल्याचा व्हायरल व्हिडीओ

कौतुकास्पद! तरूणाने शेत नांगरण्यासाठी केला अनोखा जुगाड, पाहा व्हायरल व्हिडीओ

‘अति हुशार त्याचा बैल रिकामा’; पाहा तरूणाचा मजेशीर व्हिडीओ

लग्नात नवरीसमोर नवरदेवानं असं काही केलं की सगळे पाहतच राहिले, पाहा व्हायरल व्हिडीओ

काय सांगता! चक्क एका बैलाने केला जबरदस्त स्टंट, पाहा व्हिडीओ