प्रशांत किशोर यांचे सुर बदलले म्हणाले, “भाजपचा पराभव करायचा असेल तर…”

मुंबई | आगामी लोकसभा निवडणुकीची म्हणजेच 2024 च्या लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सध्या होताना दिसत आहे. भाजपला आपली सत्ता पुन्हा कायम आव्हान असणार आहे. तर दुसरीकडे काँग्रेसला आपली प्रतिष्ठा कायम राखण्यासाठी लढावं लागणार आहे.

अशातच आता प्रसिद्ध रणनितीकार प्रशांत किशोर यांनी काँग्रेसला नवी उभारी देण्यासाठी नवा प्लॅन आखला आहे. त्याचा अहवाल देखील त्यांनी काँग्रेस सादर केलाय. त्यामुळे आता येत्या काळात काँग्रेस पुर्ण क्षमतेने मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे.

अशातच आता एका वृत्तवाहिनीशी बोलताना प्रशांत किशोर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी प्रखर विश्लेषण देखील केलं आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करायचा असेल तर तिसऱ्या आणि चौथ्या आघाडीचा उपयोग नाही, असं प्रशांत किशोर म्हणाले आहेत.

भाजपविरोधी पक्षांनी एकत्रीत येऊन स्‍थापन केलेली दुसरी आघाडीच भाजपला पराभूत करु शकेल, असंही प्रशांत किशोर यांनी म्हटलं आहे.

काँग्रेस नेते ज्यावेळी सोडून जात होते आणि ममता बॅनर्जी यांनी नवा चेहरा म्हणून समोर येत होत्या. त्यावेळी प्रशांत किशोर यांन तिसऱ्या आघाडीची गरज असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता किशोर यांनी यू टर्न घेतल्याचं पहायला मिळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘…म्हणून मी शिवसेना सोडतोय’; शिवसेनेच्या ‘या’ दिग्गज नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

“बहुजनांचा बुरखा पांघरून एक लांडगा महाराष्ट्राच्या कळपात घुसलाय”

“…तोपर्यंत महाविकास आघाडीचं सरकार चालत राहणार”, अजित पवारांच्या वक्तव्याची एकच चर्चा

मोठी बातमी! अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला ईडीचा झटका, केली ‘ही’ कारवाई

“उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदासाठी पवार-गांधींकडे हिंदुत्व गहाण ठेवलं”