“विलासरावांच्या पत्रावर मी न वाचताच सही केली अन् शरद पवार…”

मुंबई | माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यातील वाद सर्वांनाच ठाऊक आहे. पंतप्रधानांच्या शर्यतीत असलेल्या शरद पवारांना अद्याप पंतप्रधान होता आलं नाही, त्यामुळे विलासरावांचा हात होता, असं चर्चा आजही राजकीय वर्तुळात होत असते.

अशातच आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेेते सुशिलकुमार शिंदे यांनी एबीपी माझाच्या कार्यक्रमात मोठं वक्तव्य केलं आहे. शरद पवार मुख्यमंत्री होते, त्यावेळी काही लोकांनी शरद पवार यांच्या विरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला होता, असं सुशिलकुमार शिंदे म्हणाले.

काही लोकांनी एक पत्र दिल्लीला दिले होते. त्यावेळी ते पत्र घेऊन विलासराव देशमुख माझ्याकडे आले. विलासराव मला म्हणाले की, या पत्रावर सही करा. मी न वाचताच मी त्यावर सही केली, असंही ते म्हणाले.

त्यानंतर मला कळालं की त्या पत्रामध्ये शरद पवार यांनी मुख्यमंत्रीपदावरुन काढावे अशी मागणी करण्यात आली होती. त्यावेळी मी महाराष्ट्र काँग्रेसचा अध्यक्ष होतो, असा गौप्यस्फोट सुशीलकुमार शिंदे यांनी केला आहे.

मैत्रीत माणूस कसा फसतो याचा अनुभव त्यावेळी मला आला, असं वक्तव्य देखील सुशीलकुमार शिंदे यांनी केलं आहे. त्यावेळी माझी चुक झाली, अशी कबुली देखील त्यांनी यावेळी दिली आहे.

दरम्यान, गांधी कुटुंबाविषयी लोकांच्या मनात वेड आहे. गरिब माणसांच्या मनात त्यांच्याबद्दल खूप प्रेम आहे. पुन्हा सगळ्यांनी एकत्र येऊन काँग्रेस उभी केली पाहिजे, असंही सुशिलकुमार शिंदे म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

प्रशांत किशोर यांचे सुर बदलले म्हणाले, “भाजपचा पराभव करायचा असेल तर…”

‘…म्हणून मी शिवसेना सोडतोय’; शिवसेनेच्या ‘या’ दिग्गज नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

“बहुजनांचा बुरखा पांघरून एक लांडगा महाराष्ट्राच्या कळपात घुसलाय”

“…तोपर्यंत महाविकास आघाडीचं सरकार चालत राहणार”, अजित पवारांच्या वक्तव्याची एकच चर्चा

मोठी बातमी! अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला ईडीचा झटका, केली ‘ही’ कारवाई