मुंबई | मागील काही दिवसांपासून देशातील कोरोना रूग्णसंख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारने कठोर पावलं उचलण्यास सुरूवात केली आहे. (Home Minister’s big statement on lockdown)
केंद्र सरकारने काल नवी नियमावली जाहीर केली आहे. तर सर्व राज्यांना कठोर निर्णय घेण्यासाठी विचार करण्याची विनंती केली आहे. त्यामुळे आता अनेक राज्यांमध्ये निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
महाराष्ट्रात देखील कोरोना आणि ओमिक्राॅन रूग्णसंख्या वाढत असल्यामुळे आता राज्य सरकारने रात्रीची जमावबंदी लागू केली आहे. तर 31st च्या पार्श्वभूमीवर अनेक निर्बंध लागू केले आहेत.
अशातच आता महाराष्ट्रात पुन्हा लाॅकडाऊन लागणार का?, असा सवाल उपस्थित केला जातोय. त्यावर आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
तज्ज्ञांच्या माहितीनुसार आगामी काळात कोरोनाचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढण्याची चिन्हे आहेत. आपल्याला नव्या वर्षाचं स्वागत करायचं असलं तरी सर्वांनी काळजी घेणं गरजेचं आहे, असं दिलीप वळसे पाटील म्हणाले आहे.
सार्वजनिक ठिकाणी जाणं टाळावं, नवं वर्षाचा आनंद आणि उत्साह घरीच राहून साजरा करावा, असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे.
सरकारने जे काही निर्बंध घालून दिले आहेत त्यांचं पालन केलं पाहिजे, नाहीतर उद्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला तर लॉकडाऊनपर्यंत जावं लागेल, असा सुचक इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे.
दरम्यान, सध्यातरी सरकारच्या मनात लाॅकडाऊन लावण्याचा निर्णय नाही. परिस्थिती पाहून योग्य तो निर्णय घेऊ, असंही वळसे पाटील म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या –
नितेश राणे यांना धक्क्यावर धक्के! सहकार विभागाकडून मोठी कारवाई
“नारायण राणेंना नोटीस देऊन बोलावणे हा तर कायदेशीर अपराध”
भारतीय जवानांना मोठं यश; जम्मू-कश्मीरमध्ये 6 दहशतवाद्यांचा खात्मा
“आम्ही मोदींचं अनुकरण करतो, ते मास्क लावत नाहीत म्हणून आम्हीही लावत नाही”
लसवंत होणारी सर्वात पहिली अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाची लागण