पार्थ पवार म्हणतात,”आत्या तुम्ही काळजी घ्या, तुम्ही दोघं लवकरच…”

पुणे | कोरोना महामारीनं गेल्या दी़ड वर्षामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे. काही दिवसांपूर्वी कोरोना परिस्थिती थोडी सुधारत असल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. पण आता कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलं आहे.

राज्यात सध्या कोरोनाच्या रूग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होताना दिसत आहे. कोरोनाच्या नव्या ओमिक्राॅन या व्हिरेयंटने सध्या जगामध्ये धुमाकुळ घातला आहे. अशा परिस्थितीत कोरोना आणखीन घातक बनत चालला आहे.

राज्यात विविध क्षेत्रामधील निर्बंध हटवण्यात आले होते. त्यानंतर राज्यात मोठ्या प्रमाणात गर्दीचे कार्यक्रम होताना दिसत होते. राजकीय नेत्यांच्या कौटुंबिक लग्न समारंभांना मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली दिसत होती.

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत त्यांना व सदानंद सुळेंना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती. त्यानंतर राज्यभरातून त्यांच्या तब्येतीसाठी प्रार्थना करण्यात येत आहेत.

सुप्रिया सुळे यांना कोरोनाची लागण झाल्यानं त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी त्यानं बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि सुप्रिया सुळे यांचे भाचे पार्थ पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्यासाठी ट्विट केलं आहे.

आत्या काळजी घ्या. तुम्ही दोघे लवकर बरे व्हाल, अशा आशयाचं ट्विट पार्थ पवार यांनी केलं आहे. सध्या पार्थ पवार यांच्या ट्विटची राज्यात जोरदार चर्चा होत आहे. संकटाच्या प्रसंगात पवार कुटुंब किती मजबूतपणे उभा रहातं हे दर्शवणार हे ट्विट आहे.

राज्यात सध्या कोरोनाच्या रूग्णसंख्येत मोठ्य प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. मोठ्या प्रमाणात राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना कोरोनानं घेरल्याचं चित्र सध्या राज्यात आहे. परिणामी सर्वत्र चिंता पसरली आहे.

सुप्रिया सुळे यांच्या पाठोपाठ राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, भाजप नेते हर्षवर्धन पाटील, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील या नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

राधाकृष्ण विखे पाटील यांनी लग्नात हजेरी लावली होती. हर्षवर्धन पाटील यांच्या मुलीचा नुकताच विवाह संपन्न झाला आहे. तर वर्षा गायकवाड या हिवाळी अधिवेशनात उपस्थित होत्या. परिणामी आणखीन नेत्यांना कोरोनाची लागण झाली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, राज्यातील परिस्थिती दिवसेदिवस खराब होत चालली आहे. राज्य आरोग्य विभागाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे. सरकारनं लसीकरणाचा वेग वाढवला आहे.

महत्वाच्या बातम्या –

 पहाटेच्या शपथविधीवर शरद पवारांचा गौप्यस्फोट, आता अजित पवार म्हणाले…

“नारायण राणेंना नोटीस देऊन बोलावणे हा तर कायदेशीर अपराध”

भारतीय जवानांना मोठं यश; जम्मू-कश्मीरमध्ये 6 दहशतवाद्यांचा खात्मा

“आम्ही मोदींचं अनुकरण करतो, ते मास्क लावत नाहीत म्हणून आम्हीही लावत नाही”

लसवंत होणारी सर्वात पहिली अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाची लागण