‘लस न घेतलेल्या नागरिकांना…’; छगन भुजबळ यांचं मोठं वक्तव्य

नाशिक | गेल्या दीड वर्षापासून कोरोना महामारीनं देशातील प्रत्येकाचं हात बांधून ठेवले आहेत. सध्या लसीकरणाच्या माध्यमातून कोरोनाला पराभूत करण्यासाठी सर्वस्तरातून प्रयत्न करण्यात येत आहेत.

कोरोना लसीकरण सध्या 18 वर्षावरील नागरिकांच कोरोना लसीकरण चालू आहे. पण काही प्रमाणात नागरिक विविध कारणं देत लस घेण्याचं टाळत आहेत.

गावागावात, वस्ती, तांडा या भागात घरोघरी आरोग्य विभागाचे कर्मचारी जात आहेत. नागरिकांना लसीकरणाचं महत्त्व समजून सांगतात. तरीही काही नागरिक लस घेण्यास नकार देत आहेत.

लस घेण्यास नकार देणाऱ्या नागरिकांना आता सरकार कठोर नियमावलीच्या माध्यमातून लस घेण्यासाठी प्रवृत्त करणार आहे. परिणामी सरकारच्या धोरणाकडं सध्या लस न घेतलेल्या नागरिकांचं लक्ष लागलं आहे.

कोरोना प्रतिबंधीत लस न घेतलेल्या नागरिकांना पेट्रोल आणि राशन मिळणार नसल्याचं राज्याचे अन्नपुरवठा मंत्री व नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. याबद्दल विचार चालू असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.

नाशिकच्या मालेगाव भागात लसीकरणाचा वेग मंदावल्याबाबत भुजबळ यांनी चिंता व्यक्त केली आहे. लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी प्रशासनाला योग्य त्या सुचना दिल्याचं भुजबळ म्हणाले आहेत.

घर तक दस्तक या उपक्रमाच्या माध्यमातून सरकार लस घेण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करणार आहे. परिणामी सध्या नागरिकांना लस देण हीच सरकारची प्राथमिकता असल्याचं लक्षात येत आहे.

नाशिक येथे कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आलेल्या पालकमंत्री भुजबळ यांनी कोरोना परिस्थितीचा सर्वस्तरातून आढावा घेतला आहे. यावेळी त्यांनी नागरिकांनी लस घेण्याचं आवाहन देखील केलं आहे.

औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांनी लस न घेणाऱ्या नागरिकांच्या शासकिय योजना बंद करण्याची तयारी केली होती. नागरिकांना त्यांनी लस घेण्याचं आवाहन केल्यानंतर नागरिकांनी योजना जातील या भीतीनं लस घ्यायला सुरूवात केली आहे.

दरम्यान, कोरोनाला हरवण्यासाठी सध्या लसीकरण हा एकमेव पर्याय आहे. लसीकरणाच्या माध्यमातून सरकार सध्या राज्यातील नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

 राज्यातील ‘या’ सहा जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

अनिल देशमुखांना मोठा धक्का! ईडी कोठडीत ‘इतक्या’ दिवसांची वाढ

कडक सॅल्युट! भर पावसात महिला अधिकाऱ्यानं तरुणाला खांद्यावर उचलून नेत वाचवले प्राण

  “जे तलवार चालवतात ते तलवारीच्या घावानेच मरतात”

“कंगनाचा पद्मश्री काढून घ्या, ओव्हर डोस घेऊन जास्त बोलतीये”