‘…तर आम्हाला त्यांना संपवावं लागेल’; नितेश राणेंचं खळबळजनक वक्तव्य

मुंबई | त्रिपुरातील एका रॅलीत पैगंबराबद्दल अपशब्द वापरण्यात आल्याने मोठा गोंधळ उडाला होता. तर महाराष्ट्रात या घटनेचे पडसाद उमटले आहेत. अमरावतीत आज बंदनंतर वातावरण चांगलंच तापलेलं दिसत आहे.

बंदच्या वेळी दुकाने जबरदस्थीने बंद करण्यात आली तर दुकाने बंद करण्यास नकार दिल्याने दुकानांची तोडफोड देखील करण्यात आली आहे. त्यावरून आता मोठा वाद समोर आलेला दिसतोय. अशातच आमदार नितेश राणे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी माझ्यावर कारवाईची भाषा करण्यापेक्षा दंगल भडकवणाऱ्या रझा अकादमीच्या मुख्य सुत्रधारांना कधी अटक करताय ते सांगावं, असं नितेश राणे म्हणाले आहेत.

महाराष्ट्रातील विविध भागात झालेल्या सर्व हिंसाचार आणि दंगलींमागे ही दहशतवादी संघटना रझा अकादमीचा हात आहे, अशी टीका देखील त्यावेळी नितेश राणेंनी केली आहे,

प्रत्येक वेळी ते व्यत्यय आणतात आणि सर्व नियम मोडतात आणि सरकार बसते आणि पाहतं, असं म्हणत राणेंनी ठाकरे सरकारवर देखील निशाणा साधला आहे.

एकतर सरकारने त्यांच्यावर बंदी घालावी किंवा महाराष्ट्राच्या हितासाठी त्यांना संपवावे लागेल, असं वादग्रस्त वक्तव्य नितेश राणे यांनी केलं आहे.

येणाऱ्या दिवसांत रझा अकादमीच्या मुंबई कार्यालयावर आम्ही मोर्चा काढणार आहोत, असंही नितेश राणे म्हणाले आहेत.

अमरावतीमध्ये बंदच्या वेळी हिंसक वळण लागल्याची माहिती समोर आली आहे. या बंदच्या वेळी काही निदर्शकांनी राडा केल्याचं दिसून आलं होतं.

या घटनेनंतर पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी जनतेने अशा राजकारणाला बळी पडू नका आणि अफवांवर विश्वास ठेवू नये आणि जनतेने शांतता राखावी, असं आवाहन देखील केलं होतं.

दरम्यान, नितेश राणे यांच्या वक्तव्यामुळे आता राजकारण पेटण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून नितेश राणे आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

भाजप-मनसे युती होणार का?; रावसाहेब दानवेंनी स्पष्टच सांगितलं…

“तुला लईचं कळतं रं, रोहितला त्रास होईल म्हणून ऐकूण घेतोय नाहीतर…”

‘…तर तुमचं ‘कोल्हापुरी पायतान’ हातात घ्या’; राजू शेट्टी आक्रमक

“आज बाळासाहेब असते तर संजय राऊतांच्या थोबाडीत मारली असती”

…तर मी माझा पद्मश्री पुरस्कार परत करण्यास तयार – कंगना राणावत